शिवजयंती मिरवणूक

शिवजयंती मिरवणूक

मिरवणुका, शोभायात्रेतून प्रबोधनाचा जागर
शहर विकासावर भाष्य ः कोल्हापूरच्या विविध प्रश्‍नावर फलकांतून वेधले लक्ष

कोल्हापूर ःपारंपरिक शिवजयंतीनिमित्त मंडळांनी काढलेल्या मिरवणुका, बसवेश्‍वर जयंतीनिमित्त वीरशैव लिंगायत समाजातर्फे काढण्यात आलली शोभायात्रा, परशूरामांच्या जयघोषतात निघालेला परशुराम पालखी सोहळा यामुळे शुक्रवारी (ता. १०) शहरात उत्साही माहोल निर्माण झाला. पारंपरिक वाद्यांचा गजर, विविधांगी वेषभूषा अन् मार्गावर रेखाटलेल्या रांगोळ्या यामुळे वातावरण मंगलमय बनले. याशिवाय विविध प्रश्‍नांवर केलेला प्रबोधनाचा जागर हे या सांस्कृतिक सोहळ्याचे खास वैशिष्ट्य ठरले
------
लोगो शिवजयंती
-
फोटो ः 82887, 82883
-
धनगरी ढोलचा ठेका अन् ‘तय्यम’ नृत्य
कोल्हापूर, ता. १० : शिवकालीन युद्धकलेची थरारक प्रात्यक्षिके, धनगरी ढोलचा ठेका व प्रबोधनात्मक फलक अशा वातावरणात शिवजयंतीनिमित्त काढलेली संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्थेची मिरवणूक आज वैशिष्ट्यपूर्ण ठरली. दिमडीच्या ठेक्यावर वाघ्या-मुरळीने धरलेल्या नृत्याच्या ठेक्यास दाद मिळाली. संयुक्त रविवार पेठेच्या मिरवणुकीत ‘तय्यम’ नृत्याने व डान्सिंग डॉल्सने शिवप्रेमींचे लक्ष वेधले.
जुना बुधवारच्या मिरवणुकीस तोरस्कर चौकातून सायंकाळी पाचनंतर सुरुवात झाली. मालोजीराजे छत्रपती, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय पवार, पुष्कराज क्षीरसागर, ॲड. महादेव आडगुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणुकीचे उद् घाटन झाले. मिरवणुकीच्या अग्रभागी रिक्षांवर फलक लावले होते. ‘शाहिस्त्याची बोटं छाटली, अफझल्याचा कोथळा काढला,’ ‘वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिवरायांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले,’ ‘दुर्गराज रायगडावरील शिवराज्याभिषेक,’ ‘करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी,’ अशा इतिहासावर आधारीत फलकांचा समावेश होता. ‘कृपया लक्ष द्या, कोल्हापूरचे वर्षानूवर्षे रखडलेले प्रश्‍न सोडविले जातील, ही अपेक्षा ठेवू नये. महालक्ष्मी मंदिर आराखडा, राजर्षी शाहू जन्मस्थळ, थेट पाईपलाईन, खंडपीठ रंकाळा संवर्धन,’ ‘कोल्हापूरचा विकास करतो म्हणून कोण आलंय का बिंदू चौकात? विकासाच्या राजकारणाला विसरलेले नेते गटाच्या राजकारणाला कंटाळलेलं कोल्हापूर,’ या फलकांतून शहर विकासावर भाष्य केले होते. धनगरी ढोलच्या ठेक्यावर मिरवणूक सोन्या मारुती चौक, महापालिका, छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली. प्रशिक्षक महेश पाटील व योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुला-मुलींनी येथे लाठी, पट्टा, फरी गदका, दुहाती पट्टा लढतीची थरारक प्रात्यक्षिके सादर केली. वाघ्या मुरळी, वासुदेव, कडकलक्ष्मीच्या वेशभूषेतील कलाकारांनी ठिकठिकाणी नृत्य सादर केले. बिंदू चौक, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, कुंभार गल्लीमार्गे पुन्हा जुना बुधवार पेठेकडे मिरवणूक रवाना झाली. तेथे तिची सांगता झाली. उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक देसाई, नागेश घोरपडे, सुशील भांदिगरे, संदीप देसाई, अविनाश साळोखे, हेमंत साळोखे, अमोल डांगे, अनंत पोतदार, उदय भोसले, ऋषीकेश भांदिगरे, आकाश काळे, शशिकांत जाधव, संदीप राणे, मकरंद स्वामी यांनी संयोजन केले.
संयुक्त रविवार पेठेच्या मिरवणुकीची सुरुवात बिंदू चौकातून झाली. केरळमधील कालिकत येथून आणलेले ‘तय्यम’ नृत्याभोवती शिवप्रेमींची गर्दी होती. अर्धनारी नटेश्‍वर, सरस्वती, श्‍णमुख, गौरी, पार्वती, दुर्गामाता, महालक्ष्मी, कालीमाताच्या रुपातील कलाकारांचा यात समावेश होता. मल्याळम गींतावर नृत्य करत ते पुढे सरकत होते. त्यापुढे डान्सिंग डॉल्स होत्या. मोबाईलवर त्याचे फोटो टिपण्यात शिवप्रेमी गुंग होते. श्रीरामाचे मोठे कटआऊट आकर्षण होते. संयुक्त रविवार पेठ ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र पाटील, उपाध्यक्ष विनायक चंदुगडे, उत्सव समितीचे अध्यक्ष गजानन तोडकर, उपाध्यक्ष मिथून काळे, राम कारंडे, खजिनदार स्वप्नील ठोंबरे, ओमकार खराडे, सुनील यादव यांनी संयोजन केले.
---------------------
चौकट
अरे लाज तरी बाळगा...
जुना बुधवारच्या मिरवणुकीत स्टेडियमला नाव छत्रपती शाहूंचे..पण स्टेडियमची अवस्था माव्याची खाण, बाटल्यांची घाण..वादाचं स्थान..अरे लाज तरी बाळगा,’
‘अतिमोबाईल एक समस्या, मोबाईलमुळे उद्धवस्त घर संसार,’ ‘मोबाईल म्हणजे संशयाच खूळ आणि घटस्फोटाचं खूळ,’ ‘कोल्हापूरची तरुणाई नशेच्या विळख्यात,’ या फलकांतून क्रीडा व सामाजिक प्रश्‍नांवर भाष्य केले.
--------------------
चौकट
छायाचित्रे टिपण्याची हौस
निगवे दुमाला व जुना बुधवार पेठेतील मुला-मुलींनी सादर केलेली युद्धकलेची प्रात्यक्षिके अंगावर शहारे आणणारी ठरली. त्यांचे व्हिडिओ काढण्यासाठी शिवप्रेमींनी गर्दी केली.
संयुक्त रविवार पेठेच्या तय्यम नृत्य करणाऱ्या कलाकारांसमवेत लहान मुला-मुलींची मोबाईलद्वारे छायाचित्रे टिपण्याची हौस पालकांनी भागवली. ही छायाचित्रे त्यांनी स्टेटसवर लगेच झळकवली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com