रामभाऊ चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विविध कार्यक्रम

रामभाऊ चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विविध कार्यक्रम

रामभाऊ चव्हाण यांच्या
स्मृतिप्रीत्यर्थ विविध कार्यक्रम 
कोल्हापूर, ता. ११ : रामभाऊ चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ  ( कै. ) रामभाऊ दादा चव्हाण फाऊंडेशन तर्फे विविध उपक्रम राबवण्यात आल्याचे अध्यक्ष प्रसाद चव्हाण यांनी सांगितले. यामध्ये मागील वर्षी लावलेल्या रोपट्याचा वाढदिवस, शहरातील १५ अंध कुटुंबाना संसार उपयोगी शिधा, कडधान्ये, डाळी, साखर, तेल, पोहे, तांदूळ याचे वाटप, नवजात शिशु बालक, अनाथ शिशु बालक ज्यांना दुधाची कमतरता आहे. अशा बालकांना लॅक्टोजेन पावडरचे वाटप. करण्यात आले. यासह आणखीन वृक्षारोपण व संगोपनाचा मानस उपाध्यक्ष डॉ. अभिजीत डुबल यांनी सांगितला.  यावेळी फाउंडेशनचे पदाधिकारी सुजीत चव्हाण, अजित चव्हाण, जोतिराम जाधव, जय चव्हाण, यश चव्हाण, अमित सासणे, विशाल चव्हाण, शरद नागवेकर, आकाराम पाटील, प्रणव पोवार, महेश जाधव, अभिजीत गायकवाड, महादेव मोरे, महेश पन्हाळकर, अजय वणकुद्रे, कुबेर कदम, सारंग दाते, समर्थ माळी, अथर्व इंगवले, उल्हास देसाई, केवल कुऱ्हाडे, अजित नरके, सिध्देश देसाई, अरविंद तोरस्कर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com