गैरसमजातून दोघा भिक्षूकांना मारहाण

गैरसमजातून दोघा भिक्षूकांना मारहाण

मुले पळविण्याच्या गैरसमजातून
दोघा भिक्षुकांना मारहाण
शहाजी लॉ कॉलेज चौकातील प्रकार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः भिक्षा मागण्यासाठी आलेले परप्रांतीय भिक्षूक मुलांना पळवत असल्याची अफवा पसरल्याने दोघा भिक्षुकांना जमावाकडून मारहाण करण्यात आली. समीर जोगी व साहील जोगी (सध्या रा. मिरज, मूळ रा. उत्तर प्रदेश) अशी त्यांची नावे आहेत. या प्रकाराची दखल घेत पोलिसांनी त्यांच्या मिरजेतील नातेवाईकांना बोलावून खातरजमा केली. हा प्रकार गैरसमजुतीतून घडल्याने चौकशीनंतर दोघांना सोडून देण्यात आले.
राजारामपुरी परिसरात शनिवारी सकाळी तीन ते चार भिक्षूक आले होते. राजाराम उद्यान परिसरात हे दोघे एका मुलाला बोलावत असल्याचा समज झाल्याने काही रिक्षाचालकांनी त्यांना अडवले. यानंतर मोठा जमाव एकत्र आल्याने यातील दोघांनी पळ काढला. तर समीर व साहील जमावाच्या हाती लागल्याने त्यांना बेदम चोप देण्यात आला. दोघेही जमावाला विनवणी करीत होते. यानंतर याची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन दोघांना ताब्यात घेतले.
पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी स्थानिक रहिवाशांकडून घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. शहर उपअधीक्षक अजित टिकेही शाहूपुरी पोलिस ठाण्यात आले. त्यांनीही संबंधित भिक्षुकांकडे विचारणा केली असता पंधरा ते वीस कुटुंबे मागील चार महिन्यांपासून मिरजेत वास्‍तव्यास आल्याचे समजले. जमावाने पकडलेल्या दोघांच्याही कुटुंबीयांना पोलिस ठाण्यात बोलाविण्यात आले. तसेच आधारकार्डसह ओळखपत्रांची खातरजमा करण्यात आली. घडलेल्या प्रकाराबद्दल दोघांनाही समज देण्यात आला. दोघांनीही पुन्हा कोल्हापूर शहरात येणार नाही, असे मान्य केल्यानंतर त्यांचे जबाब नोंदवून सुटका करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com