वळीव पाऊस बातमी

वळीव पाऊस बातमी

८३०३९
कोल्हापूर ः शहरात शनिवारी जोरदार सरी बरसल्या.

विजांच्या कटकडाटासह वळीव बरसला

शहरात संध्याकाळी शिडकावा; रात्री जोरदार सरी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः शहरात आज विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या वळवाने तापमानाचा पारा उतल्याने नागरिकांना काहीसा गारवा मिळाला. संध्याकाळी शिडकावा पडला आणि रात्री जोरदार सरी बरसल्या. यावेळी वेगाने वारा वाहात होता, मात्र कोठेही नुकसान झाले नाही. दरम्यान, जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पावसाने सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली.
उन्हाने त्रासून गेलेल्या शहरवासीयांना वळवाच्या पावसाची प्रतीक्षा लागली होती. गेल्या आठवड्यात थोडासा शिडकावा झाल्याने काहीसा दिलासा मिळाला होता, मात्र वातावरणातील उष्णता पुन्हा वाढली होती. या आठ दिवसांत तापमानाची सरासरी ३८ अंश ते ४२ अंशापर्यंत होती. त्यामुळे उकाडा असह्य झाले होते. आज सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते, तरीही तापमानाचा पारा अधिकच होता. हवेत दमटपणाही जाणवत होता. दुपारी अधिकच गरम होऊ लागले होते. दुपारी ४ वाजल्यानंतर जोराने वारा वाहू लागला. ढगांचा गडगडाट होऊन पावसाला सुरुवात झाली. शहराभोवतालच्या उपनगर आणि ग्रामीण भागात दमदार वळीव बरसला. शहरात मात्र शिडकावा पडला. यामुळे काहीसा कमी झालेला उकाडा संध्याकाळी ६ वाजल्यानंतर पुन्हा वाढला. रात्री ९ वाजता मात्र पावसाच्या जोरदार धारा कोसळू लागल्या. सुमारे पाऊण तास धो-धो पाऊस सुरू होता. या पावसाने कोठेही नुकसान झाले नाही. दमदार पावसाने रात्री हवेमध्ये काहीसा गारवा होता. सोसाट्याचा वारा सुटल्याने शहरासह उपनगरातील विद्युतपुरवठा काही काळासाठी खंडित झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com