कॉंक्रीट मशीनला धडकून दचाकीस्वाराचा मृत्यू

कॉंक्रीट मशीनला धडकून दचाकीस्वाराचा मृत्यू

83024
...
काँक्रिट मशीनला धडकून
दुचाकीस्वाराचा मृत्यू
संभाजीनगर येथील दुर्घटना ः दुचाकी घसरून अपघात

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः संभाजीनगर येथे दुचाकी घसरल्याने चालकाचे डोके बाजूला असलेल्या काँक्रिट मशीनला धडकून झालेल्या अपघातातील जखमीचा मृत्यू झाला. दत्तात्रय अशोक पोवार (वय ३१, रा. रामानंदनगर) असे मृताचे नाव आहे. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू होते. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी- चार मे रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दत्तात्रय पोवार हे दुचाकीवरून संभाजीनगराकडून रामानंदनगराकडे चालले होते. हनुमाननगराच्या वळणावर त्यांची दुचाकी घसरली. त्यांचे डोके बाजूला असणाऱ्या एका मशीनवर आदळल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचार सुरू असताना शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. पोवार हे एका खासगी ट्रॅव्हल्सवर चालक म्हणून काम करत होते. त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.
...
काँक्रिट मशीनबाबत प्रशासनही उदासीन...
संभाजीनगर चौकातून आयटीआय चौकापर्यंत रस्त्याच्या कडेला अनेक सिमेंट काँक्रिट मिक्सिंगची मशीन उभी केली जातात. याचा वाहतुकीला अडथळा होत असल्याचे स्थानिक रहिवाशांनी वारंवार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते; मात्र यावर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने या मशीन त्याच ठिकाणी लावल्या जातात. अखेर त्यातील एका मशीनमुळे पोवार यांना जीव गमवावा लागला, अशी चर्चा सीपीआर आवारात सुरू होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com