चाकूहल्ल्यात दोघे गंभीर ः तिघांना अटक

चाकूहल्ल्यात दोघे गंभीर ः तिघांना अटक

83050 सुजल भोसले
83051 यश लोहार
83052 राहुल गडनाईक
...
राजोपाध्येनगरात दोघांवर चाकूहल्ला
पूर्ववैमनस्यातून प्रकार ः तिघा संशयितांना अटक
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः पूर्ववैमनस्यातून राजोपाध्येनगरात दोघांवर चाकूहल्ला करण्यात आला. राजवर्धन राहुल कांबळे (वय १७, रा. साई प्रसाद कॉलनी, राजोपाध्येनगर) व यश रवींद्र सुतार (रा. नाना पाटीलनगर) अशी जखमींची नावे आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी तिघा हल्लेखोरांना अटक केली.
यश संदीप लोहार (वय २०), सुजल प्रमोद भोसले (१८, दोघे रा. न्यू कणेरकरनगर) व राहुल रमेश गडनाईक (३०, रा. शिवशक्ती कॉलनी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास राजवर्धन व त्याचा मित्र यश राजोपाध्येनगरात थांबले होते. यावेळी संशयित राहुल गडनाईक तेथे आला. पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून त्याने दोघांना शिवीगाळ केली. ‘आज तुम्हाला जिवंत सोडत नाही,’ असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. संशयित सुजल भोसले व यश लोहार या दोघांनी खिशातून चाकू काढून दोघांच्या डोके, मान, पाठीवर वार करून गंभीर जखमी केले. यानंतर हल्लेखोर पळून गेले. स्थानिक रहिवाशांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. दाखल झालेल्या गुन्ह्यावरून पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेत त्यांना अटक केली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विशाल पोटोळे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com