गड-तिराळे मारहाण निषेध

गड-तिराळे मारहाण निषेध

गडहिंग्लज श्रमिक वृत्तपत्र
संघटनेकडून बातमीदार मारहाणीचा निषेध
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १२ : ‘सकाळ’चे मुरगूड येथील बातमीदार प्रकाश तिराळे यांना झालेल्या मारहाणीचा येथील गडहिंग्लज श्रमिक वृत्तपत्र विक्रेता संघटनेकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे. तिराळे यांना मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही केली आहे. याबाबतचे पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले आहे.
पत्रकात म्हटले आहे, समाजातील एखाद्या घटकावर अन्याय होत असेल, तर त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम पत्रकार करीत असतात. त्यांच्याकडून समाजाला जागरुक ठेवण्याचे काम केले जाते; पण ‘सकाळ’चे मुरगूड बातमीदार प्रकाश तिराळे यांना आमच्या विरोधात का बातमी छापली, असे विचारत शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख राजेखान जमादार यांनी शिवीगाळ केली. तसेच मारहाणही करण्यात आली. या घटनेचा निषेध करीत आहोत. जमादार यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी.
श्रमिक वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष महादेव अडसुळे, उपाध्यक्ष नामदेव लुगडे, सचिव सुरेश खोत, काशिनाथ गडकरी, अजित स्वामी, दत्ता घुगरे, बाळू हेब्बाळे, बाळासाहेब पोवार, बंडा केसरकर, काशिनाथ पाटील, चंद्रकांत नेवडे, संभाजी गंधवाले, ऋषिकेश स्वामी, सुशांत अडसुळे, विजय देवान्नावर, विनायक पाटील आदींनी हे निवेदन दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com