‘मौर्या’ ची उद्योगभरारी थक्क करणारी

‘मौर्या’ ची उद्योगभरारी थक्क करणारी

83184
83206
...
‘मौर्या’ची थक्क करणारी उद्योगभरारी
किंवा
‘मौर्या’ने निर्यातीतून वाढवला कोल्हापूरचा नावलौकिक

बाराशे जणांना रोजगार देत वेगाने वाटचाल; जगभरात निर्यात करत कोल्हापूरचा नावलौकिक

संतोष मिठारी : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ : आत्मविश्वासाला प्रामाणिक कष्टाची जोड दिली की, अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. हे सत्यात उतरविण्याची किमया मौर्या उद्योग समूहाचे चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर मंगेश पाटील यांनी साधली आहे. अवघे दहा कर्मचारी, दोन सीएनसी मशीनसह पहिल्या वर्षी तीन लाखांची उलाढाल अशी त्यांनी उद्योगाची सुरुवात केली आणि गेल्या १८ वर्षांत यशाची पावले टाकली. आज जगभरातील युरोप, अमेरिका, इस्रायल अशा सुमारे दहा देशांमध्ये निर्यात, बाराशे जणांना रोजगार आणि पाचशे कोटींच्या वार्षिक उलाढालीसह कोल्हापूरचा नावलौकिक वाढवित ‘मौर्या’ वाटचाल करीत आहे.
निर्यात क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन २०१५ पासून राज्य शासनाचे सहा पुरस्कार ‘मौर्या’ने पटकाविले आहेत. त्यानिमित्त श्री. पाटील यांनी ‘सकाळ’शी संवाद साधला. उद्यमशीलतेचा वसा आणि औद्यौगिक क्षेत्रातील अनुभव गाठीशी नसताना गेल्या १८ वर्षांत त्यांनी ‘मौर्या’च्या माध्यमातून घेतलेली उद्योग भरारी थक्क करणारी आहे.
मंगेश पाटील सांगतात की, ‘वडिलांनी भारतीय प्रशासकीय सेवेत काम केले असल्याने साहजिकच माझे देखील आयएएस होण्याचे स्वप्न होते. महाविद्यालयीन शिक्षणानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली, पण स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हते. त्यादृष्टीने तयारी सुाल केली. मात्र, युपीएससीमध्ये यशाने तीनवेळा हुलकावणी दिली. एमपीएससीमध्ये यशापर्यंत पोहोचत असतानाच काही कारणावरून बोर्ड बरखास्त होऊन परीक्षा रद्द झाली. मग, यापुढे आणखी परीक्षा मी देणार नाही, असे घरात सांगितले. माझ्याकडे बी-प्लॅनही नव्हता. आई-वडिलांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी मशिनिंग युनिट संबंधित काम करण्याचे सुचविले. पदवीचे शिक्षण घेताना सीएनसी मशीनबाबत वाचले होते. प्रत्यक्षात त्याबाबत काही ज्ञान नव्हते. पण, २००५-०६ मध्ये धाडसाने एका सीएनसी मशीनवर गोकुळ शिरगाव एमआयडीसीमध्ये काम सुरू केले. या क्षेत्रातील जुन्या लोकांना भेटत, छोटी-छोटी कामे करत राहिलो. त्यातून वर्षभरात मशीनची संख्या दोन, तर कर्मचाऱ्यांची संख्या दहावर पोहोचली. अचानक २००८ मध्ये आलेल्या मंदीने माझ्या उद्योगाची धडधड कमी झाली. त्यावर पॅनिक झालो नाही. केवळ ऑटोमोटिव्हपुरते काम करून चालणार नाही, हे लक्षात आले. त्यानुसार ग्राहकाभिमुख सेवा देत उद्योगाची दिशा बदलली. चांगल्या लोकांना जोडून भक्कम टीमवर्क करत कास्टिंग्ज विथ मशिनिंगमध्ये काम करण्याचे ठरवून मशिनिंग युनिट वाढविली. ‘वर्ल्ड प्लेयर’ बनण्याचा दृष्टिकोन माझ्या उद्योगातील प्रत्येक घटकामध्ये रुजवून कार्यरत राहिलो. एका सीएनसीमधील नटबोल्ट उत्पादनापासूनची वाटचाल आज विमानाच्या सिस्टीम, स्ट्रक्चरचे भाग, अमेरिकेमधील टॉप ईव्हीला लागणाऱ्या सुट्या भागांच्या निर्मितीपर्यंत पोहोचली आहे.
...
‘किचकट इंजिनिअरिंग’मध्ये हातखंडा
मंगेश पाटील म्हणाले, ‘गोकुळ शिरगाव एमआयडीसीत मौर्या इंडस्ट्रीज, तर कागल-हातकणंगले फाईव्ह स्टार एमआयडीसीमध्ये मौर्या अलॉय, मौर्या कास्टिंग्ज आणि मौर्या ग्लोबल या कंपन्या कार्यान्वित आहेत. ऑटोमोटिव्ह, ऑफ हायवे, फार्म, ट्रान्समिशन, कमर्शियल व्हेईकल्स, ऑईल अँड गॅस, ऐरोस्पेस आदी क्षेत्रांत ‘मौर्या’ ग्रुप कार्यरत आहे. इंजिनिअरिंगमधील किचकट कामे पूर्ण करण्यात आमचा हातखंडा आहे. पुढील तीन वर्षांत वार्षिक उलाढाल एक हजार कोटींवर नेण्याचे ध्येय आहे.’
...
कर्मचाऱ्यांचा ‘हॅपिनेस’ जपला
‘कर्मचाऱ्यांचा हॅपिनेस इंडेक्स जपला आहे. त्यांच्यासाठी मेडिक्लेम, कॅंटीन, मुलांना शिष्यवृत्ती आदी उपक्रम राबवितो. त्यासाठी अमेरिकन कंपनीने ‘ग्रेट प्लेस टू वर्क’ असे प्रमाणपत्र दिले आहे. ‘सीएसआर’ फंडातून गोरगरीब कुटुंबांतील मुलांच्या शिक्षण आणि पर्यावरण संवर्धनाला बळ दिले जाते. एमआयडीसी, करवीर तालुक्यात विविध ठिकाणी दहा हजार रोपे लावली असल्याचे पाटील यांनी सांगितले.
...

‘नियोजनबद्ध टीमवर्क, युनिकनेसपणाच्या जोरावर आणि चांगली टीम, व्हेंडर, सप्लार्य या घटकांच्या बळावर आम्ही यशस्वी वाटचाल करीत आहोत. ‘मौर्या’च्या उद्योगभरारीत मित्र परिवार, कुटुंबियांची साथ मोलाची ठरली आहे.
- मंगेश पाटील, चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर, मौर्या उद्योग समूह

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com