वडणगे

वडणगे

83186

वडणगे ः येथे शिवजयंतीनिमित्त झालेल्या मोफत महाआरोग्य शिबिरात रुग्णाची तपासणीप्रसंगी डॉ. सूरज पाटील बाजीराव पाटील, अमोल तेलवेकर, केवलसिंग रजपूत आदी मान्यवर.

वडणगेतील महाआरोग्य
शिबिरात ४७३ जणांची तपासणी

वडणगे, ता. १२ ः येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या मोफत महाआरोग्य शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळाला. संयुक्त माळवाडीतर्फे मोफत आरोग्य शिबिर राबविण्यात आले. शिबिरात तब्बल ४७३ जणांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. त्यामध्ये नंदादीप नेत्रालय हॉस्पिटलकडून ४० लोकांचा मोतीबिंदू व डोळ्यावरील मांस काढण्याची शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे. साई कार्डियाक हॉस्पिटलतर्फे हृदयरोगावरील ईसीजी कार्डोग्राफसह प्रथम तपासणी झाल्या. पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारकांना मोफत ॲंजोप्लास्टी करण्यात येणार आहे. मगदूम इंडो सर्जरी इन्स्टिट्यूटतर्फे अत्याधुनिक लेझर द्वारे ट्रीटमेंट केली. मोरया हॉस्पिटलतर्फे पोटविकारावर उपचार, तपासणी झाली. आरोग्य शिबिरासाठी प्रयाग चिखलीचे माजी सरपंच केवळसिंग रजपूत यांचे सहकार्य मिळाले. कार्यक्रमासाठी बाजीराव पाटील, सतीश पाटील, अमोल तेलवेकर, ज्ञानदेव करपे उपस्थित होते. अजित रणदिवे, चेतन बराले, विकी पाटील, सुशांत घोरपडे, सूरज पाटील, अक्षय इंगवले, स्वप्नील बराले, गणेश तांबेकर आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com