महानगरपालिकेच्या शाळांना हवे ‘चांगले छप्पर’

महानगरपालिकेच्या शाळांना हवे ‘चांगले छप्पर’

फोटो- 83226
........
महापालिकेच्या शाळांना हवे ‘चांगले छप्पर’
स्लॅब, वर्गांची डागडुजी आवश्यक; भौतिक सुविधा भक्कम करण्याची गरज

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ ः शहरातील विविध परिसरातील सर्वसामान्य, कष्टकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी महापालिकेच्या शाळा महत्त्वाच्या आहेत. त्यापैकी अनेक शाळांचे छप्पर पावसाळा सुरु होण्यापूर्वी चांगले होणे आवश्यक आहे. काही स्लॅब, वर्गांच्या भिंती, फरशा, स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. छतांची दुरवस्था झालेल्या बहुतांश शाळांमध्ये काल, शनिवारी रात्री झालेल्या वादळी पावसानंतर वर्ग खोल्यांमध्ये पाण्याची मोठी गळती झाली.
शहरातील भाऊसो महागावकर विद्या मंदिर आणि मुलींची शाळा क्रमांक सहाच्या इमारतीच्या स्लॅबला गळती लागली आहे. बोंद्रेनगर विद्यालय, सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालय, वीर ककक्या विद्यालयाच्या छताची दुरावस्था झाली आहे. ज्योतिर्लिंग विद्यालयातील वर्ग खोल्यांमध्ये फरशी बसविलेली नाही. नेहरुनगर विद्यालयाच्या स्वच्छतागृहाची दुरुस्तीसह त्यांची संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे. या विद्यालयातील एका वर्ग खोलीस नवीन पत्रा बसविण्याची गरज आहे. वि. स. खांडेकर विद्यालयाचे छत गळत असून, वर्ग खोल्यांच्या भिंतींमध्ये मोठ्या भेगा पडल्या आहेत. जरगनगर, नेहरूनगर, जाधववाडी, जाधववाडी, टेंबलाईवाडी, फुलेवाडी आणि ज्योतिर्लिंग विद्यालयामध्ये आणखी किमान दोन वर्ग खोल्यांची आवश्यकता आहे. सरनाईक वसाहतीमधील उर्दू विद्यालयालाच्या स्लॅबची गळती काढून स्वच्छतागृह वाढविण्यासह नव्या दोन वर्ग खोल्यांच्या भिंतीना गिलावा करण्याची गरज आहे. अण्णासो शिंदे विद्यालयाच्या मागील बाजूस संरक्षक भिंत नसल्याने त्या परिसरातील कचरा थेट मैदानात पसरत असून ते रोखणे महत्त्वाचे आहे.

चौकट
माहिती मागितली पण, कार्यवाही नाही
शाळांना आवश्यक असलेल्या भौतिक सुविधांची माहिती दोन महिन्यांपूर्वी प्रशासनाने मागविली. पण, त्यावर पुढे कोणतीही कार्यवाही झालेली नाही. महापालिकेच्या ६० टक्के शाळांमधील भौतिक सुविधांची दुरवस्था झाली आहे. आता उन्हाळी सुटी सुरू आहे. त्यामध्ये शाळांतील स्लॅब, भिंतींची डागडुजी आणि भौतिक सुविधा भक्कम कराव्यात. नेहमीप्रमाणे वेळ निघून गेल्यावर महापालिका प्रशासनाने जागे होवू नये. त्वरीत कार्यवाही करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
......
कोट
जूनमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होण्यापूर्वी ज्या काही शाळांच्या दुरुस्तीची आवश्यकता आहे. अशा शाळांच्या दुरुस्तीची व्यवस्था महापालिकेनेच तातडीने करावी म्हणजे पावसाळ्यामध्ये शिक्षक, विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही.
-सुधाकर सावंत, राज्य प्रमुख (नपा/ मनपा विभाग), प्राथमिक शिक्षक समिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com