जगदीश खेबूडकर

जगदीश खेबूडकर

फोटो- 83228

एक्क्यान्नव गायकांनी गायिली एक्क्यान्नव गीते..
‘सिफा बुक’मध्ये नोंद, जगदीश खेबुडकर यांच्या स्मृतींना अनोखा उजाळा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ ः अरे अरे माणसा तू..., गेली सांगून ज्ञानेश्वरी...टाळ बोले चिपळीला..., ऐरणीच्या देवा तुला...अशा एकाहून एक अवीट गीतांची अनोखी मैफल आज सजली. प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त सरगम म्युझिकल ग्रुपने ही मैफल आयोजित केली. मैफलीत खेबुडकर यांनी शब्दबद्ध केलेली ९१ गीते ९१ गायकांनी सादर केली. दरम्यान, या उपक्रमाची नोंद सिफा बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (सोसायटी ऑफ इंटिग्रेटेड फेडरेशन ऑफ ॲवॉर्ड) झाली.
खेबुडकर यांच्या प्रतिमापूजनाने सकाळी नऊला उपक्रमाला प्रारंभ झाला. सायंकाळी सहापर्यंत मैफलीत विविध गीते सादर झाली.
‘सिफा’चे डॉ. दीपक राऊत, पी. ए. पाटील यांच्यासह कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या माजी अध्यक्षा डॉ. गीता पिलाई, डॉ. आशा शितोळे, सुभाष भाट यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यभरातील गायकांनी या मैफलीत गीते सादर केली. डॉ. राऊत, डॉ. शितोळे, श्रद्धा बडे, सुभाष भाट, डॉ. प्रकाश काळे यांच्या हस्ते सरगम म्युझिकल ग्रुपच्या सदस्यांनी प्रमाणपत्र स्वीकारले.

चौकट
अवतरली अस्सल कोल्हापुरी संस्कृती
खेबुडकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या राज्यभरातील गायकांसह हौशी गायकांनी या उपक्रमाला उपस्थिती लावली. कोल्हापुरी फेटे, नऊवारी साडीचा थाटही यानिमित्ताने अनुभवायला मिळाला. डॉ. संदीप पाटील यांनी तर धनगरी वेशभूषेत ‘गेली सांगून ज्ञानेश्वरी’ हे गीत सादर केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com