प्रा. किसनराव कुराडे यांना जीवनगौरव

प्रा. किसनराव कुराडे यांना जीवनगौरव

gad131.jpg
83264
पाचगणी : शिवाजी विद्यापीठ समाजशास्त्र परिषदेतर्फे डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते प्रा. किसनराव कुराडे यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी डॉ. मच्छिंद्र सकटे, अभयकुमार साळुंखे आदी उपस्थित होते.
---------------------------
प्रा. किसनराव कुराडे यांना ‘जीवनगौरव’
गडहिंग्लज, ता. १४ : येथील शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांना शिवाजी विद्यापीठ समाजशास्त्र परिषदेतर्फे दिला जाणारा ‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान केला. पाचगणी येथील मीनलबेन मेहता महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले.
प्रा. कुराडे यांच्या समाजशास्त्र विषयातील योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार दिला. शिवाजी विद्यापीठ समाजशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. मच्छिंद्र सकटे, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, महाराष्ट्र राज्य प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य क्रांतिकुमार पाटील, मीनलबेन मेहता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश देसाई, डॉ. आर. व्ही. शेजवळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. संजय साळुंके, शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे, शिवाजी विद्यापीठ समाजशास्त्र अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा डॉ. अर्चना जगतकर, डॉ. आर. पी. हेंडगे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com