शाळांमध्ये स्वच्छतागृह

शाळांमध्ये स्वच्छतागृह

लोगो
...
१५४ शाळांमध्ये होणार
नवीन स्वच्छतागृह
जिल्हा परिषद : तालुकापातळीवर यादी तयार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ : जिल्हा परिषदेच्या ज्या शाळांमध्ये मुला-मुलींसाठी स्वच्छतागृह नाहीत, अशा १५४ शाळांमध्ये नव्याने स्वच्छतागृह बांधली जाणार आहेत. त्यानुसार तालुकापातळीवर यादी तयार केली आहे. यामध्ये मुलांसाठी ७३ आणि ८१ शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहे बांधली जाणार आहेत.
जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक शाळांमध्ये स्वच्छतागृह असणे गरजेचे आहे. काही शाळांमध्ये अजूनही स्वच्छतागृह नाही. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी अशा १५४ शाळांमध्ये नव्याने स्वच्छतागृह असावे, असा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला आहे. लवकरच या प्रस्तावानुसार नवीन स्वच्छतागृहांचे नियोजन केले जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी असावे, तत्काळ वैद्यकीय सेवा असावी याशिवाय सर्वांत महत्त्‍वाची आणि अत्यावश्‍यक असणारी बाब म्हणजे स्वच्छतागृह असायला पाहिजे. जिल्ह्यातील हजारो शाळांमध्ये स्वच्छतागृह आहेत. मात्र, त्यांची डागडुजी होणेही तितकेच गरजेचे आहे. वापराविना पडून असलेल्या स्वच्छतागृहांची मोडतोडही झाली असल्याचे चित्र आहे. प्रत्येक शाळेत स्वच्छ आणि वापरता येईल, अशा स्वच्छतागृहांची बांधणी झाली पाहिजे.
दरम्यान, नव्याने होत असलेल्या बांधकामामध्ये पाणी व स्वच्छतेचा विचार केला जावा, अशीही मागणी होत आहे. अनेक ठिकाणी मुलींसाठी स्वच्छतागृहांची सोय नाही. याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी सर्व अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात लागणाऱ्या स्वच्छतागृहांची माहिती घेऊन हा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या मख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मंजुरीला पाठवला आहे.
....

मुला-मुलींसाठी तालुकानिहाय बांधली जाणारी स्वच्छतागृहे
तालुका* मुली* मुले
शाहूवाडी* २३* ३२
पन्हाळा* १५* ०५
हातकणंगले* ०७* ०३
करवीर* ०६* ०३
गगनबावडा* ०१* ०३
राधानगरी* ०२* ०६
कागल* ०७* ०५
भुदरगड* ०६* ०५
आजरा* ०७* ०४
गडहिंग्लज* ०६* ०३
शिरोळ* ००* ०४
...
‘जिल्ह्यातील १५४ शाळांमध्ये तातडीने स्वच्छतागृहे झाली पाहिजेत, यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार लवकरच याची कामे सुरू केली जातील.
मीना शेंडकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com