कोल्हापूर

कोल्हापूर

83393
कोल्हापूर ः शहाजी लॉ कॉलेजमध्ये बौद्धिक संपदा हक्क, या विषयावरील व्याख्यानात बोलताना डॉ. एस. बी. सादळे.

‘आयडिया’ हे भविष्यकाळातील
अर्थव्यवस्थेचे बलस्थानः डॉ. सादळे

कोल्हापूर, ता. १३ ः ‘आयडिया’ हे भविष्यकाळातील अर्थव्यवस्थेचे बलस्थान असेल, असे मत शिवाजी विद्यापीठाच्या आयपीआर सेलचे संचालक डॉ. एस. बी. सादळे यांनी व्यक्त केले. शहाजी लॉ कॉलेजमध्ये बौद्धिक संपदा हक्क, या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. यावेळी ते बोलत होते. प्रा. डॉ. सविता रासम प्रमुख उपस्थित होत्या.
डॉ. सादळे म्हणाले, ‘बौद्धिक संपदा हक्काच्या अनुषंगाने असलेले विविध कायदे लक्षात घेता यामध्ये करिअरच्या संधींचा अवकाश मोठा आहे. तो लक्षात घेतल्यास कायद्याच्या विद्यार्थ्यांना यामध्ये सर्वोत्तम करिअर करता येईल. क्षेत्र कोणतेही असो त्यामध्ये संशोधन, नवनिर्मितीला महत्त्व असतेच आणि त्यात कॉपीराईट, ट्रेडमार्क, पेटंट, ‘जीआय’, इंडस्ट्रियल डिझाईनच्या संदर्भातून अनेक बाबी येतात, त्या बौद्धिक संपदा हक्काच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरतात. यापूर्वी एखादे क्षेत्र वा उत्पादन अर्थव्यवस्थेला गतिमान करण्यात हातभार लावत असे. मात्र, अभिनव संकल्पना हे उद्याच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा घटक ठरणार आहे. याबाबत जो देश काम करेल, त्‍याची अर्थव्यवस्था विस्तारेल.’
डॉ. रासम यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. प्रा. कल्याणी पवार यांनी परिचय करून दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com