राहूल देशपांडे कलेक्टिव्ह

राहूल देशपांडे कलेक्टिव्ह

मुख्य लोगो 83482 हा वापरावा
--
फोटो व चौकट लोगो कोल्हापूर शनिवार ११ मे अंक ३ मधील बातमीतून
---
पिवळ्या रंगातील लोगो घेऊ नये
--


उत्सुकता शिगेला, तिकीट विक्रीला उद्यापासून प्रारंभ
रविवारी रंगणार चितळे डेअरी प्रस्तुत ‘राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’ मैफल

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ : प्रसिद्ध गायक-संगीतकार राहुल देशपांडे यांच्या चितळे डेअरी प्रस्तुत ‘राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’ या बहारदार संगीत मैफलीच्या ऑफलाईन तिकीट विक्रीला बुधवार (ता. १५) पासून प्रारंभ होणार आहे. सकाळ माध्यम समूहातर्फे या मैफलीचे आयोजन केले असून, रविवारी (ता. १९) सायंकाळी साडेसहा वाजता ही मैफल रंगणार आहे. काजवे फर्निचर, एस. जी. फायटो फार्मा प्रायव्हेट लिमिटेड असोसिएट स्पॉन्सर आहेत.
दरम्यान, महासैनिक दरबार हॉलच्या लॉनवर रंगणाऱ्या या मैफलीत राहुल देशपांडे हिंदी व मराठी सिनेगीतांसह गझल सादर करणार आहेत. साहजिकच या मैफलीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ऑनलाईन तिकीट बुकिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
आजोबा वसंतराव देशपांडे यांच्याकडून गायनाचा समृद्ध वारसा लाभलेले राहुल यांनी अल्पावधीतच स्वतंत्र ओळख निर्माण केली. शास्त्रीय संगीतासह नाट्यगीते, सुगम संगीत, चित्रपट गीते, गझल अशा सर्व गायन प्रकारांवर त्यांचे प्रभुत्व आहे. विविध संगीत प्रकारांतील वैविध्यपूर्ण गाणी ते या मैफलीत सादर करतील. त्यांना लाईव्ह संगीतसाथ असेल. अवीट गझलांची अनुभूतीही ते देणार आहेत. चला, तर मग आजच तिकीट बुक करूया. एका बहारदार मैफलीचे साक्षीदार होऊया.
...
मैफलीविषयी...
० कधी : रविवार (ता. १९)
० वेळ : सायंकाळी ६.३० वाजता
० ठिकाण : महासैनिक दरबार हॉल लॉन, सर्किट हाऊस परिसर
० व्हीव्हीआयपी तीन व्यक्तींसाठी सोफा, त्यानंतर प्लॅटिनम, डायमंड आणि गोल्ड चेअर अशी बैठक व्यवस्था
० राहुल देशपांडे तीन वर्षांनंतर कोल्हापुरात. तरुणाईसह ज्येष्ठ आणि सहकुटुंब अनुभवावी अशी मैफल
० ग्रुप बुकिंगला प्राधान्य. व्यापाऱ्यांसह विविध आस्थापनांना कर्मचाऱ्यांसाठी मैफलीची देता येईल अनोखी भेट
...
लोगो, क्यूआर कोड- शनिवारच्या बातमीतून
तिकिटे उपलब्ध, सन्मानिका नाहीत...
‘सकाळ’च्या शिवाजी उद्यमनगर येथील कार्यालय आणि चितळे एक्स्प्रेस (राजारामपुरी) येथे बुधवार (ता. १५) पासून मैफलीच्या ऑफलाईन तिकीट विक्रीला प्रारंभ होणार आहे. ऑनलाईन तिकिटे www.ticketkhidakee.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यासाठी सोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करावा. हा पूर्णपणे तिकीट शो असल्याने कोणत्याही प्रकारच्या विनामूल्य सन्मानिका दिल्या जाणार नाहीत.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९५५२५८१९१८.

‘सकाळ’च्या वाचक
वर्गणीदारांसाठी खास सवलत
‘सकाळ’च्या वाचक वर्गणीदारांसाठी मैफलीसाठी खास सवलत दिली आहे. गोल्ड चेअर विभागातील तिकिटांवर दहा टक्के इतकी ही सवलत असून, त्याचा वाचक वर्गणीदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ‘सकाळ’ने केले आहे.
..........
कोट
05767
राहुल देशपांडे यांच्या शास्त्रीय आणि उपशास्त्रीय मैफलींची अनुभूती आपण अनेकदा घेतली आहे; पण जुन्या गीतांसह गझलांचा अनुभव पहिल्यांदाच या मैफलीच्या निमित्ताने तमाम रसिकांना घेता येणार आहे. आम्हा साऱ्या रसिकांची या मैफलीबाबतची उत्‍कंठा वाढली असून, चितळे डेअरी हा मैफलीचा एक भाग असल्याचा नक्कीच अभिमान आहे. ही मैफल नक्कीच अविस्मरणीय होईल.
- गिरीश चितळे, चितळे डेअरी.

कोट
83442
तब्बल तीन वर्षांनंतर राहुल देशपांडे यांना ऐकण्याची संधी कोल्हापूरकरांना प्रत्यक्ष मिळणार आहे. तीही केवळ शास्त्रीय गायनाचीच नव्हे, तर सिनेगीत आणि गझलांचीही अनुभूती ते देणार आहेत. कोल्हापूरकरांच्या सेवेसाठी आम्ही दोन जूनपासून हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात पदार्पण करत असून, उचगाव परिसरात आम्ही हॉटेल सुरू करत आहोत. आमच्या ग्राहकांसाठी ही मैफल एक पर्वणीच ठरणार आहे.
- अभय कोटकर, संचालक, हॉटेल एके जीमॅक.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com