‘सीबीएसई’ परीक्षेत कोल्हापूरच्या शाळा ‘शंभर’ नंबरी

‘सीबीएसई’ परीक्षेत कोल्हापूरच्या शाळा ‘शंभर’ नंबरी

‘सीबीएसई’ परीक्षेत कोल्हापूरच्या शाळा ‘शंभर’ नंबरी

दहावी, बारावीचा एकत्रित निकाल जाहीर; विद्यार्थ्यांचे धवल यश

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई बोर्ड) दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी ऑनलाईन जाहीर झाला. त्यात कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी धवल यश मिळविले. बहुतांश शाळांचा दहावीचा निकाल १०० टक्के आणि बारावीचा ९७ टक्क्यांहून अधिक निकाल लागला आहे. सलग दुसऱ्या वर्षी सीबीएसईने दहावी, बारावीचा निकाल एकत्रित जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना आता तात्पुरत्या स्वरूपात ऑनलाईन गुणपत्रिका डिजिलॉकरद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी अधिक आहे. दोन आठवड्यांमध्ये मूळ गुणपत्रिका मिळणार आहे.
...
डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल
पेठ वडगाव येथील डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलचा बारावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. स्कूलमध्ये अहान माडगूट (९२.४० टक्के प्रथम क्रमांक), सर्वेश शिंदे आणि श्रेयश कोराडे (९१ टक्के द्वितीय), मल्हार सातपुते (८९.८० टक्के तृतीय) यांनी यश मिळविले आहे. इयत्ता दहावीचा निकालही शंभर टक्के लागला असून, आदित्य पाटील आणि आरुष गोवळकर (९६ टक्के प्रथम), करणसिंह पोळ आणि ओम महाजन (९५.४० टक्के द्वितीय), श्लोक खटावकर (९५.२० टक्के तृतीय) यांनी बाजी मारली. यशस्वीतांमध्ये ७७ मुले आणि २६ मुलींचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव पोळ, उपाध्यक्षा विजयादेवी यादव, संस्था सचिव विद्या पोळ, प्राचार्य डॉ. सरदार जाधव, एएफपीआयचे चेअरमन विश्वास कदम, संचालक मेजर चंद्रसेन कुलथे, आदींचे मार्गदर्शन लाभले.
...
शांतीनिकेतन ज्युनिअर कॉलेज
शांतिनिकेतन ज्युनिअर कॉलेजच्या विज्ञान, वाणिज्य, कला शाखेचा बारावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या स्कूलच्या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये बिनीश वच्छानी (९७.८० टक्के), अर्पना कास्सा (९६.४०), पार्श्व पोरवल (९५.४०), आयमन शेख आणि रितिका गुप्ता (९४), हर्षद जाधव (९३.८०), आर्ची ओसवाल (९३.२०), वर्चस्व मोरे (९२), विधी परमार (९१.२०) यांचा समावेश आहे. सर्व विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालिका राजश्री काकडे, कार्यकारी संचालक करण काकडे, प्राचार्या जयश्री जाधव व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
...
जवाहर नवोदय विद्यालय
कागल येथील जवाहर नवोदय विद्यालयाचा दहावी आणि बारावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. इयत्ता दहावीमध्ये पाच विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक, तर ४५ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. मराठी विषयात १९ विद्यार्थ्यांनी शंभर पैकी शंभर गुण मिळविले आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये आर्यनंदिनी कदम (९७.६० टक्के प्रथम), अनुष्का ननवरे (९७ द्वितीय), हर्षद रावळ (९६.६० तृतीय), आदिती पाटील (९६ चतुर्थ) यांचा समावेश आहे. इयत्ता बारावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्यातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये गिरीष जाधव (९० टक्के प्रथम), श्रीधर कांबळे (८९ द्वितीय), सौजन्या चव्हाण आणि वैष्णवी बागडी (८७ तृतीय) यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना प्राचार्य रवी दामोदर, शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
...
संजीवन इंग्लिश मीडियम स्कूल
श्री. शाहू शिक्षण प्रसारक मंडळाच्या संजीवन इंग्लिश मीडियम स्कूल रंकाळाचा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शाळेतील सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये, तर २३ विद्यार्थी विशेष प्रावीण्‍य श्रेणीसह उत्तीर्ण झाले आहेत. आयुष कोंडेकर (९५.६० टक्के प्रथम), स्वराली जाधव (९४.४० द्वितीय), गायत्री देशपांडे व कौस्तुभ भोसले (९४.२० तृतीय), प्रेम हडकर (९३.८० चौथा), श्रावणी बरगे (९३.४० पाचवा) या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. त्यांना संस्थेचे अध्यक्ष मेघराज खराडे, सचिव अजित खराडे, चेअरपर्सन अमर सरनाईक, संचालक युवराज पाटील, प्राचार्या अपूर्वा सरनाईक, उपप्राचार्या स्नेहा पाटील, ऐश्वर्या पाटील-भवड, शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
...
कोल्हापूर पब्लिक स्कूल
आर. एल. तावडे फौंडेशन संचलित कोल्हापूर पब्लिक स्कूलचा दहावी, बारावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्यातील दहावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये साक्षी म्हेतर (९६.२ टक्के प्रथम), सिद्धी धावते (९५.८ द्वितीय), रितिका भोसले आणि एस. मोहनीश (९५.६ तृतीय), आदिश जोखे (९४.४ चौथा), सम्यक पाटील (९४.२ पाचवा) यांचा, तर बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये श्रीपाद विजापुरे (९४ टक्के प्रथम), संस्कार गाडे (९३.२ द्वितीय), श्रीनिधी सावंत (९२.८ तृतीय विज्ञान), चिराग गगराणी (९३.४ टक्के प्रथम), पूर्वी पोदार (९१.८ द्वितीय), कुशल बांगड (८५.२ तृतीय) यांचा समावेश आहे. त्यांना संस्थेचे अध्यक्ष किशोर तावडे, संस्थापिका शोभा तावडे, मुख्याध्यापिका अंजली मेळवंकी, प्रतिभा सापळे, आशा आनंद, विजयंता चोपडे, आदींचे मार्गदर्शन लाभले.
...
पोद्दार इंटरनॅशनल स्कूल
पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. त्यातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये सृकृती मिनकिकर (९७.६० टक्के प्रथम), गार्गी काळे (९६.६० द्वीतीय), शर्वरी देसाई, श्रेया पाटणकर (९६.४० तृतीय) यांचा समावेश आहे. २४ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जादा, अन्य २४ विद्यार्थ्यांनी ८० ते ९० टक्के मिळविले आहेत. त्यांना प्राचार्या शिल्पा कपूर, उपप्राचार्या मनीषा आंब्राले, आदींचे मार्गदर्शन लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com