पावणे चार लाखांचे सोन्याचे दागिणे लंपास

पावणे चार लाखांचे सोन्याचे दागिणे लंपास

नवीन वाशी नाका येथे
सराफी दुकानात चोरी

छत फोडून प्रवेश; पावणेचार लाखांवर डल्ला

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः नवीन वाशीनाका येथील राधिका ज्वेलर्सच्या छतातून आत प्रवेश करून सुमारे ३ लाख ८० हजारांचे सोन्याचे दागिने चोरट्याने लांबवले. गुरुवारी (ता. ९) रात्री नऊ ते शुक्रवारी (ता. १०) सकाळी दहाच्या दरम्यान ही चोरी झाली. याची फिर्याद श्रीगणेश दाजी खताळ यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली आहे.
पोलिसांनी सांगितले, की खताळ यांचे राधिका ज्वेलर्स हे दुकान नवीन वाशी नाका येथे आहे. गुरुवारी त्यांनी पेढी बंद केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते उघडण्यासाठी तेथे आले. तेव्हा त्यांना चोरी झाल्याचा संशय आला. अधिक माहिती घेतली असता छतावरील पत्रा उचकटून आतील पीओपी फोडून चोरट्याने दुकानात प्रवेश केल्याचे दिसून आले. तसेच पेढीच्या काउंटरवरील ड्रॉव्हर उचकटून त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चोरल्याचे आढळून आले. यात साधारण ५० ग्रॅमचे मध्यभागी सोन्याची पट्टी असलेले सोन्याचे गंठण (सुमारे दोन लाख रुपये), तसेच २८ ग्रॅमचे दोन सोन्याचे गंठण, सोन्याची लेडीज अंगठी पाच ग्रॅम, आठ ग्रॅम, वजनाचे दोन टॉप व पाच ग्रॅम वजनाच्या कानातील रिंगा, बटन, टॉप्स असे १ लाख ८० हजारांचे सोन्याचे दागिने चोरट्याने नेल्याची फिर्याद श्री. खताळ यांनी दिली आहे. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक अजित टिके, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे आणि उपनिरीक्षक संतोष गळवे यांनी भेट दिली असून अधिक तपास सुरू आहे.
-------------
चोरटा सीसीटीव्हीत कैद
पेढीमध्ये चार सीसीटीव्ही आहेत. त्यामध्ये चोरटे मध्यरात्री १ वाजून ३८ मिनिटांनी आत आले आहेत. ते रात्री सव्वा तीनपर्यंत पेढीतच असल्याचेही एका कॅमेऱ्यात दिसले आहे. चोरट्याने मिक्स रंगाचा टी शर्ट परिधान केला होता व त्याचे वय वीस ते बावीस वर्षांपर्यंत असावे, असा अंदाज खताळ यांनी व्यक्त केला आहे. सीसीटीव्हीत एकच चोरटा असल्याचे दिसते. मुख्य रस्त्याच्या बाजूलाच पेढी आहे. तेथे साधारण दोन तासांहून अधिक काळ चोरटा आत होता. तरीही याची खबर इतर कोणालाही लागली नाही. त्या परिसरात पोलिसांची गस्त होत नाही, असेही सांगण्यात आले. झालेली चोरी रेकी करून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. अधिक तपासात चोरटा माहितीचा असण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com