पोलिस वृत्त एकत्रित

पोलिस वृत्त एकत्रित

प्रवाशाची सोन्याची चेन चोरीस
कोल्हापूर : येथील मध्यवर्ती बसस्थानकात रविवारी सकाळी फलाट क्र. १० वर एसटी बसमध्ये चढताना तरुणाची सुमारे अडीच तोळे सोन्याची चेन चोरस गेली. निखिल बाबूराव उपाध्ये (वय २१, रा. शाहूपुरी, सातवी गल्ली) यांनी याची फिर्याद शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी सांगितले की, निखिल हे कामानिमित्त बसमधून गावी जात असताना बसमध्ये चढताना त्यांच्या गळ्यातील चेन चोरट्याने पळविली. बसमध्ये बसल्यानंतर चेन चोरीस गेल्याचे निखिल यांना समजले. त्यांनी शोधाशोध केली. आजूबाजूच्या प्रवाशांना विचारले. बसमधून खाली उतरून इतर प्रवाशांकडेही चौकशी केली. चेन चोरीला गेल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात याची फिर्याद दिली.
...
खुनातील संशयित तेंडुलकरला
१८ पर्यंत पोलिस कोठडी
कोल्हापूर : राजारामपुरीत दारूच्या नशेत मित्राचा खून करणाऱ्या संशयित सन्मेश अशोक तेंडुलकर (वय ५४, रा. राजारामपुरी, सातवी गल्ली, कोल्हापूर) याला आज न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला शनिवार (ता.१८) पर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती राजारामपुरी पोलिसांनी दिली. राजारामपुरी येथील सातव्या गल्लीत कोटणीस हाईट्समध्ये सन्मेशने शनिवारी मध्यरात्री मित्र दिनेश अशोक सोळांकूरकर (वय ३४, रा. रेखानगर, गारगोटी) याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने स्वतः खून केल्याची माहिती पोलिस कंट्रोलला दिली. याची नोंद राजारामपुरी पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिसांनी त्याला अटक करून आज न्यायालयात हजर केले. अधिक तपास राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे करीत आहेत.
...
दरेवाडीतील तरुणाची आत्महत्या
कोल्हापूर : दरेवाडी (ता. पन्हाळा) येथे तरुणाने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. आदेश सुरेश जाधव (वय २१) असे त्याचे नाव आहे. त्याला गुरुवारी (ता. ९) सीपीआरमध्ये दाखल केले होते. आज सकाळी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
...

ए. एस. ट्रेडर्स सुनावणीवेळी
तपास अधिकारी गैरहजर
कोल्हापूर : ए. एस. ट्रेडर्स ॲण्ड डेव्हलपर्स कंपनीतील संशयितांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात दहा मे रोजी सुनावणी झाली. यावेळी तपास अधिकारी हे जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान गैरहजर राहिल्याने न्यायमूर्तींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच पोलिस अधीक्षक यांना तपासी अधिकारी हे गैरहजर राहिल्याबाबत व ॲफिडेव्हीट दाखल न केल्याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच पोलिस अधीक्षक यांनी हे ॲफिडेव्हीट १४ जून २०२४ पूर्वी दाखल करण्याचेही आदेश दिल्याची माहिती रोहित ओतारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. फिर्यादीच्यावतीने ॲड. जयंत बारदोस्कर व सरकारतर्फे ॲड. वीरा शिंदे काम पाहत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com