मान्सूनपूर्व आढावा

मान्सूनपूर्व आढावा

फोटो-83470

तुंबणाऱ्या चौकासाठी स्वतंत्र पथके स्थापन करा
प्रशासक ः नाल्यातील अतिक्रमण, धोकादायक इमारतींवर कारवाई करा

कोल्हापूर, ता. १३ : पावसाळ्यात जे चौक वारंवार तुंबतात, त्या ठिकाणी स्वच्छतेसाठी आरोग्य विभागाचे स्वतंत्र पथक स्थापन करावे. नाल्यातील अतिक्रमणांची तपासणी करून कारवाई करावी. धोकादायक इमारतींवर कारवाई करावी, अशा सूचना प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या.
मान्सून आणि संभाव्य पूरस्थितीसाठी तयारीचा आढावा घेतला. यावेळी उद्यान अधीक्षकांनी काही राहिलेल्या धोकादायक झाडांबाबत वृक्ष कमिटीची मान्यता घ्यावी, असे सांगण्यात आले.
प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी पूरस्थितीत अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी फोन सुरू ठेवावेत. स्थलांतरितांच्या निवाऱ्याची, सर्वसुविधेची कामे पूर्ण करा. अग्निशमन दलाने साधन सामुग्रीची तपासणी करून घ्यावी. औषधांचा पुरेसा साठा करून ठेवावा. ड्रेनेज लाईनची स्वच्छता पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावी, अशा सूचना दिल्या. अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी उपशहर अभियंत्यांनी पॅचवर्कची कामे फिरती करून किती अपूर्ण आहेत, याची माहिती सादर करावी. मुरमाचा साठा करावा. मुख्य इमारतीत वॉररूम बरोबरच विभागीय कार्यालय स्तरावर दक्षता पथके व आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. दोन दिवसांत त्याबाबतचे आदेश काढण्याच्या सूचना शहर अभियंता व कामगार अधिकाऱ्यांना दिल्या.
सार्वजनिक शौचालय व मुतारींच्या स्वच्छतेची मोहीम राबवा. डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून खासगी जागेवरील गवत व झाडे झुडपे काढून परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना जागा मालकांना द्या. उघड्यावर टाकलेल्या टायर जप्तीची मोहीम राबवा. सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक व अनधिकृत बोर्ड इस्टेट विभागाने काढून घ्यावेत. शाळांमध्ये गळती असल्यास प्राथमिक शिक्षण मंडळाने त्यांची यादी देऊन दुरुस्त करून घ्याव्यात. उपायुक्त साधना पाटील, पंडित पाटील, सहायक आयुक्त कृष्णा पाटील, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजित घाटगे, आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा, उपशहर अभियंता सतीश फप्पे, आर. के. पाटील, रमेश कांबळे, महादेव फुलारी, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com