रस्ता तपासणी करा

रस्ता तपासणी करा

रस्त्यांच्या गुणवत्तेची तांत्रिक
सल्लागारामार्फत तपासणी करा

के. मंजुलक्ष्मी; कामातील अडथळे दूर करण्याचे आदेश

कोल्हापूर, ता. १३ : महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत शहरामध्ये सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामातील अडथळे दूर करून रस्ता उपलब्ध करण्याचे आदेश प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी चारही उपशहर अभियंत्यांना दिले. तसेच कामाचा दर्जा व गुणवत्ता तांत्रिक सल्लागाराकडून वेळोवेळी तपासा, असेही आदेश शहर अभियंत्यांना दिले.
पाच रस्त्यांची कामे संथ सुरू असल्याबाबत आज के. मंजुलक्ष्मी यांनी ठेकेदारांबरोबरच अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये मंजूर रस्तेनिहाय कामाचा आढावा घेतला. के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, ‘‘पहिले ठरलेले पाच रस्ते ठेकेदारांनी मुदतीत पूर्ण करावेत. प्रत्येक कामावर ठेकेदाराचे प्रतिनिधी, सल्लागार व विभागीय कार्यालयाकडील संबंधित अभियंता यांनी स्वत: उपस्थित राहून काम करवून घ्यावे. रस्ता करण्यापूर्वी गॅस पाइपलाइन व पाणीपुरवठा पाइपलाइन प्रस्तावित असल्यास ती त्वरित पूर्ण करूनच काम सुरू करावे. त्यावर असलेले अडथळे त्वरित काढून ठेकेदारांना काम करण्यासाठी रस्ते उपलब्ध करून द्यावेत. पुणे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे तांत्रिक लेखापरीक्षक वाय. टी. लोमटे-पाटील यांनी प्रत्येक रस्त्याच्या गुणवत्तेबाबतची तपासणी करून त्याचा अहवाल द्यावा.’’
अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजित घाटगे, उपशहर अभियंता सतीश फप्पे, आर. के. पाटील, रमेश कांबळे, महादेव फुलारी, प्रकल्प सल्लागार संदीप गुरव व ‘एव्हरेस्ट इन्फ्रा’चे संचालक अशोक भोसले, प्रकल्प व्यवस्थापक सत्तार मुल्ला उपस्थित होते.

वाहतुकीची कोंडी; नागरिकांना त्रास
मंगळवार पेठेतील रस्त्याचे काम सुरू केले असल्याने तेथील वाहतूक पर्यायी मार्गायने वळवली आहे. त्यामुळे न्यू महाद्वार रोड नाथागोळे तालीम या रस्त्यावरून वाहतुकीची कोंडी जाणवत होती. तसेच केएमटी बस दुसऱ्या मार्गाने वळवल्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. बसचा मार्ग समजण्यासाठी तसेच तिथेपर्यंत जाण्यासाठी धावपळ करावी लागली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com