नालेसफाई तपासणी

नालेसफाई तपासणी

फोटो- 83446

नालेसफाईसाठी आणखी मशिनरी घ्या
प्रशासकांच्या सूचना, ४८७५ टन गाळ उठाव

कोल्हापूर, ता. १३ : ‘नालेसफाईसाठी आवश्‍यकता भासल्यास आणखी मशिनरी तातडीने घ्या. पण, सफाई लवकर पूर्ण करा,’ अशा सूचना प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या.
त्यांनी आज सफाईकामाची पाहणी केली. जयंती पंपिंग स्टेशन, सुतार वाडा, गाडी अड्डा, रिलायन्स मॉल या चार ठिकाणी काम चांगल्या प्रकारे झाल्याचे समाधान व्यक्त केले. आजअखेर १०२९ डंपर गाळ काढून उठाव केला आहे. जयंती नाल्याच्या १७ पैकी १० किलोमीटरमधील काम पूर्ण झाले. गोमती नाल्याच्या साडेसातपैकी अर्धा किलोमीटरचे काम राहिले आहे. ३० मेपर्यंत उर्वरित काम पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी सहायक आयुक्त कृष्णा पाटील यांना दिल्या.
सुतार वाड्याजवळून ८३३ टन, रिलायन्स मॉल येथे ६७०, गाडी अड्डा १५२४, जयंती पंपिंग स्टेशन १८० टन गाळ उठाव केला आहे. वाय. पी. पोवारनगर येथून ११०, मनोरा हॉटेल १४८३ टन गाळ उठाव केला. सुतारवाड्यातून ७५ टन फ्लोटिंग मटेरियल काढले. आजअखेर ४८७५ टन गाळ काढला आहे. अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, जल अभियंता हर्षजित घाटगे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार, आरोग्य निरीक्षक स्वप्नील उलपे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com