नव्या ‘एमआयडीसीं’च्या प्रस्तावांवर कार्यवाहीची प्रतिक्षा

नव्या ‘एमआयडीसीं’च्या प्रस्तावांवर कार्यवाहीची प्रतिक्षा

नव्या ‘एमआयडीसी’ंच्या प्रस्तावांवर कार्यवाहीची प्रतीक्षा
सुमारे ९०० हेक्टरची वाढ होणार; कोल्हापूरच्या उद्योगचक्राला गती मिळणे आवश्यक

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः उद्योगविस्तारासाठी जागेची मागणी उद्योजकांकडून वाढत आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र वाढविण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाने विकासवाडी, कौलव, डोणोली-आवळी, आकिवाट-सैनिक टाकळी या चार नव्या एमआयडीसींचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यावर गतीने कार्यवाही होण्याची प्रतीक्षा उद्योजकांना आहे.
जिल्ह्यात सध्या शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल-हातकणंगले पंचतारांकित, गडहिंग्लज, आजरा, हलकर्णी याठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. त्याठिकाणी गेल्या पाच वर्षांत एकूण २४६ भूखंडांचे वाटप औद्योगिक विकास महामंडळाकडून झाले आहे. याठिकाणी जागा उपलब्ध नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील आणि अन्य जिल्ह्यातील उद्योजकांकडून होणाऱ्या जागेची मागणी पूर्ण करण्यासाठी आता चार नव्या एमआयडीसी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
करवीर तालुक्यातील विकासवाडीमधील भूसंपादनाचा प्रस्ताव शासनाने काही त्रुटींची पूर्तता करण्यासाठी संबंधित प्रस्ताव ‘एमआयडीसी’कडे परत पाठविला आहे. शिरोळ तालुक्यातील आकिवाट-सैनिक टाकळीमधील एमआयडीसीसाठीच्या भूसंपादनाचा मोबदला देण्याबाबतचा प्रस्ताव शासन दरबारी आहे. पन्हाळा औद्योगिक क्षेत्रातील डोणोली-आवळी परिसरातील भूसंपादनासाठीची अधिसूचना राजपत्रामध्ये प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू आहे. राधानगरी तालुक्यातील कौलव येथील एमआयडीसीसाठी जागा आणि रस्त्याकरिता लागणाऱ्या भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्याची तयारी करण्यात येत आहे. या चार एमआयडीसी मंजूर झाल्यानंतर जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्रात सुमारे ९०० हेक्टरची वाढ होणार आहे. कोरोनानंतर विविध आव्हानांचा सामना करत उद्योगचक्र बऱ्यापैकी पूर्वपदावर आले आहे. त्याला गती देण्यासाठी जिल्ह्यात नवे उद्योग येण्यासह विस्ताराला बळ देण्यासाठी शासन दरबारी असलेल्या या नव्या एमआयडीसींच्या प्रस्तावांवर लवकर कार्यवाही होणे आवश्यक आहे.
.......
कोट
या चारही नव्या एमआयडीसींच्या प्रस्तावावर आवश्यक कार्यवाही केली जात आहे. लागणारी कागदपत्रे, तांत्रिक बाबींची वेळोवेळी पूर्तता करण्यात येत आहे. उद्योजकांना लवकर जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- राहुल भिंगारे, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी
........
कोट
गोकुळ शिरगाव, कागल-हातकणंगले पंचतारांकित आदी औद्योगिक वसाहतींमधील रस्ते, पाणी व्यवस्था, पथदिवे अशा पायाभूत सुविधांसाठी राज्य सरकारने चांगला निधी दिला आहे. आता या नव्या एमआयडीसींची लवकर सुरुवात करण्यात यावी.
- स्वरुप कदम, उपाध्यक्ष, गोशिमा
......
चौकट
एसएमएसई, कृषिपूरक उद्योगांना चालना
विकासवाडी येथे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना, तर कौलव, डोणोली-आवळीमध्ये कृषिपूरक आणि आकिवाट-सैनिक टाकळी परिसरातील टेक्सटाईल उद्योगांना चालना मिळणार आहे.
.....
चार्ट करावा
‘एमआयडीसी’निहाय क्षेत्र (हेक्टरमध्ये)
विकासवाडी- २५४
आकिवाट-सैनिक टाकळी- ७४.९४
डोणोली-आवळी- २५०
कौलव-१५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com