रेवण्णा

रेवण्णा

83437

एच. डी. रेवण्णा यांना सशर्त जामीन
बंगळूर, ता. १३ : महिला अपहरणप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले माजी मंत्री, आमदार एच. डी. रेवण्णा यांना विशेष लोकप्रतिनिधी न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. पुरावे नष्ट करू नयेत, परदेशात, के. आर. नगरसह गुप्त ठिकाणी जाऊ नये, या अटींसह पाच लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर न्यायमूर्ती संतोष गजानन भट यांनी जामीन मंजूर केला.
हासनचे अश्‍लील व्हिडिओचे पेन ड्राईव्ह प्रकरण उघडकीस आल्यानंतर पीडित महिलेच्या मुलाने म्हैसूरच्या के. आर. नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि त्याच्या आईचे अपहरण झाल्याचा आरोप केला. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास विभागाच्या अधिकाऱ्यांनी एच. डी. रेवण्णा आणि त्यांचे सहकारी सतीश बाबू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या रेवण्णा यांनी लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.

प्रज्वलच्या निवासस्थानाची पाहणी
दरम्यान, एफएसएल पथकाने आज सकाळी खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या आर. सी. रोडवरील निवासस्थानी भेट देऊन पाहणी केली. सीआयडीमध्ये प्रज्वलवर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती पाहता न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे अधिकारी पुरावे गोळा करण्यासाठी खासदारांच्या निवासस्थानी पोहोचले. स्थानिक पोलिसांच्या उपस्थितीत एफएसएल अधिकाऱ्यांनी खासदारांच्या निवासस्थानाचे कुलूप काढून आत जाऊन प्रत्येक खोलीची तपासणी केली. एसआयटी अधिकाऱ्यांच्या पथकाने पीडितेला खासदाराच्या निवासस्थानी आणले. यावेळी व्हिडिओ चित्रिकरण करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com