मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची अडचण

मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची अडचण

‘मुक्त विद्यापीठा’च्या विद्यार्थ्यांची अडचण

दोन अभ्यासक्रमांच्या परीक्षा एकाचवेळी; वेळापत्रकात बदल करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाअंतर्गत होणाऱ्या बी. ए. भाग - १ तसेच बालसंगोपन आणि रंजन शिक्षण या अभ्यासक्रमांच्या परीक्षा २४ ते २९ मे दरम्यान एकाचवेळी होणार आहेत. त्याचे वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमांच्या सुमारे शंभर विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे.
विद्यापीठातर्फे या शिक्षणक्रमाअंतर्गत होणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यात बी. ए. भाग - १ अभ्यासक्रमाची परीक्षा २४ ते २९ मे दरम्यान आणि बालसंगोपन आणि रंजन शिक्षण अभ्यासक्रमाची परीक्षा २४ ते २७ मे या कालावधीत होणार आहे. त्यात अनुक्रमे सहा आणि चार पेपर होणार असून, त्यांची वेळ देखील एकसारखी आहे. ‘बालसंगोपन’ची परीक्षा ही प्रवेशानंतर सहा महिन्यांनी घेण्यात येणार होती. मात्र, ती पुढे ढकलली गेली. आता या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी एकाच वेळेला आल्यामुळे जे विद्यार्थी दोन्ही परीक्षेला बसले आहेत. त्यांची अडचण झाली आहे. त्यांना कोणतीही एक परीक्षा देता येणार आहे. वर्षभर केलेली तयारी, वेळ आणि त्यांचा खर्च देखील वाया जाणार आहे. दरम्यान, याबाबत विद्यापीठाच्या कोल्हापूर विभागीय केंद्रात काही विद्यार्थ्यांनी विचारणा केली असता त्यांना विद्यापीठाकडूनच या दोन्ही परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असल्याचे उत्तर दिले जात आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यापीठाने या दोन्ही अभ्यासक्रमांच्या वेळापत्रकात थोडा बदल करून परीक्षांचे नियोजन करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
...
लवकरच निर्णय घेतला जाईल
‘या दोन्ही अभ्यासक्रमांच्या परीक्षांबाबतचे विद्यार्थ्यांचे निवेदन प्राप्त झाले आहे. त्याबाबत विद्यापीठ पातळीवरून विचार लवकरच करून निर्णय घेतला जाईल’, असे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com