गड-प्रेस क्लब आंदोलन

गड-प्रेस क्लब आंदोलन

83559
गडहिंग्लज : राजेखान जमादारला अटक करावी, या मागणीसाठी गडहिंग्लज प्रेस क्लबतर्फे निषेध फेरी काढण्यात आली.
...
जमादारच्या अटकेसाठी पत्रकार रस्त्यावर
गडहिंग्लजला आंदोलन : प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १४ : ‘सकाळ’चे मुरगूड बातमीदार प्रकाश तिराळे यांना मारहाण करणाऱ्या राजेखान जमादारला अटक करावी, या मागणीसाठी शहर आणि तालुक्यातील पत्रकार रस्त्यावर उतरले. दसरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून निषेध फेरी काढत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. गडहिंग्लज प्रेस क्लबतर्फे हे आंदोलन झाले.
पत्रकार जगदीश पाटील, राम मगदूम, दत्ता देशपांडे, अजित माद्याळे, प्रवीण आजगेकर, प्रदीप पाटील, अवधूत पाटील, रोहित ताशिलदार, महादेव तुरंबेकर, प्रकाश चोथे, नितीन मोरे, आदेश विचारे, संतोष आंबी, एम. ए. शिंदे, दिनकर पाटील, विठ्ठल चौगुले, गणेश बुरूड, मंझूर बागवान, रवींद्र हिडदुगी, सादिक नगारसे, अशोक मोहिते, सुनील कांबळे, मनीष कोले, अजित सुतार, अमर डोमणे, मज्जिद किल्लेदार, आशपाक किल्लेदार, अदित्य चव्हाण यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
...
हातकणंगले विभागातून निषेध
हातकणंगले : पत्रकार मारहाणीच्या निषेधार्थ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशन हातकणंगले विभागाच्या वतीने तहसीलदार कल्पना ढवळे-भंडारे व पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सदानंद कुलकर्णी, प्रा. रवींद्र पाटील, अतुल मंडपे, सचिन भानुसे, आनंदा काशीद, विवेक स्वामी, राजेंद्र जगदेव, तानाजी पाटील, संदीप कुंभार, शिवाजी वाघरे, शिवाजी चव्हाण, गजानन खोत, विनोद पाटील, राकेश खाडे, सचिन लोंढे, सागर जमने, भारत जमने, नंदिनी चव्हाण, श्रद्धा जोगळेकर, आदी उपस्थित होते.
...
कडक कारवाईची मागणी
पन्हाळा : मारहाणप्रकरणी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशन पन्हाळा शाखेच्यावतीने शिवसेना शिंदे गटाचा जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार व त्याच्या साथीदारांवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी पन्हाळा उपविभागीय अधिकारी, पोलिस निरीक्षक व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी रामचंद्र काशिद, नितीन भगवान, राजू मुजावर, कृष्णात हिरवे, उत्तम महाडिक, राजेंद्र दळवी, इंद्रजित शिंदे, संजय पाटील, अबिद मोकाशी, आदी उपस्थित होते.
...
पश्चिम पन्हाळा ग्रामीण पत्रकार संघाचे निवेदन
कळे : कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशन व पश्चिम पन्हाळा ग्रामीण पत्रकार संघ (ता. पन्हाळा) च्या वतीने शिवसेना शिंदे गटाचा जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार व त्याच्या साथीदारांवर कडक कारवाई व्हावी, अशा मागणीचे निवेदन कळे पोलिस ठाण्याला देण्यात आले. यावेळी धनाजी गुरव, रवींद्र पाटील, बाबासाहेब चौगले, शिवाजी पाटील, अरुण तळेकर, कृष्णकुमार कांबळे, सागर मोरे, सचिन सुतार, सरदार काळे, रघुनाथ मोरे, आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com