वस्त्रनगरीची वाटचाल पुन्हा अस्वच्छतेकडे

वस्त्रनगरीची वाटचाल पुन्हा अस्वच्छतेकडे

ich142,3,4,5,6.jpg

इचलकरंजी ः शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. या कचऱ्याचा वेळेत उठाव होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरात घाणीचे साम्राज्य पसरत चालले आहे.
83632
१) बीएसएनएल कार्यालय परिसर
83633
२) आयजीएम रुग्णालय कॉर्नर
83634
३) षटकोन चौक
83635
४) विकली मार्केट
83636
५) दाते मळा. (अमर चिंदे ः सकाळ छायाचित्रसेवा)

वस्त्रनगरीची वाटचाल पुन्हा अस्वच्छतेकडे
इचलकरंजीत ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य ः महापालिकेच्या आरोग्य विभागाची ढिलाई
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १४ ः शहरातील विविध भागांत पुन्हा कचऱ्यांचे ढीग आढळून येत आहेत. महापालिकेकडे कचरा उठाव करणारी यंत्रणा असतानाही ती कुचकामी ठरल्याचे दिसत आहे. एकेकाळी कचरा कोंडाळामुक्त इचलकरंजी असा मान मिळवलेल्या या शहराची वाटचाल पुन्हा स्वच्छतेकडून अस्वच्छतेकडे होत चालली आहे. स्वच्छतेसारख्या अतिसंवेदनशील प्रश्‍नावर महापालिकेची आरोग्य यंत्रणेची ढिलाई दुर्लक्ष करण्यासारखी नाही. एकीकडे महापालिकेचे प्रशासकीय कार्यालयात विशेष स्वच्छता मोहीम राबवली जात असताना शहरात मात्र अस्वच्छतेमुळे अवकळा पसरत चालली आहे.
इचलकरंजी महापालिकेकडून स्वच्छतेबाबत सातत्याने जागर केला जात आहे. त्यामुळेच ‘स्वच्छ व सुंदर इचलकरंजी’ असे चित्र बनत गेले. शहरातील बहुतांश कचरा कोंडाळे बंद झाले आहेत. नागरिक घरातील कचरा गटारीत टाकत होते. त्यामुळे गटारी सतत तुंबल्याचे चित्र दिसत होते. पण घरोघरी जाऊन कचरा संकलित करण्यास सुरुवात केल्यानंतर उघड्यावर पडणारा कचरा थांबला. त्यामुळे ठिकठिकाणी दिसणारे कचऱ्याचे ढीग गायब झाले. नागरिकांनाही घंटागाडीतच कचरा टाकण्याची सवय लागली. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेच्या मानांकनात इचलकरंजी महापालिकेने वेळोवेळी चांगली सुधारणा करण्याचा प्रयत्न केला.
पण अलीकडील काही दिवसांत शहरात पुन्हा कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. शहरातील सर्वच भागात असे चित्र आहे. कचरा उठाव करण्यासाठी महापालिकेने खासगी यंत्रणा नियुक्त केली आहे. पण त्यावर नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. वर्दळीच्या मार्गावरच कचरा साचत आहे. त्यामध्येच भटकी जनावरे फिरत असतात. त्यामुळे विदारक चित्र निर्माण होत आहे. त्याचा परिणाम शहरातील सार्वजनिक आरोग्यावर होण्याची भीती आहे. सध्या वळीव पावसाचे दिवस आहेत. या पावसात साचलेला कचरा भिजल्यानंतर परिसरात दुर्गंधी पसरण्याची शक्यता आहे. त्याहीपेक्षा सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा वेळेत उठाव करण्यासाठी महापालिकेची ठोस यंत्रणा कार्यान्वित असणे आवश्यक आहे.
-----
नागरिकांवर कारवाई पण...
एकीकडे उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात तत्परता दाखवली जात आहे; पण साचलेला कचरा उठाव करण्याकडे मात्र आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. याबाबत संबंधितांवर कारवाईची गरज आहे. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यास पुन्हा इचलकरंजी अस्वच्छनगरी होण्यास वेळ लागणार नाही.
-------------
नवीन निविदा काढण्याची प्रतीक्षा
घरोघरी जाऊन कचरा संकलित करण्याच्या कामाची निविदा कधीच संपली आहे. काही महिन्यांपूर्वी नवीन निविदा काढण्याचा प्रयत्न झाला; पण तक्रारींमुळे निविदा प्रक्रियाच रद्द करण्याची वेळ प्रशासनावर आली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे याबाबतची प्रक्रिया पूर्णतः थांबली होती. आचारसंहिता संपताच आता नवीन निविदा काढून हे काम सक्षम ठेकेदाराकडे देण्याची गरज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com