यंदा तीन महिन्यात एस.टी.ची ११८ कोटींची कमाई

यंदा तीन महिन्यात एस.टी.ची ११८ कोटींची कमाई

फाईल फोटो
...
तीन महिन्यांत एसटीची ११८ कोटींची कमाई
कोल्हापूर विभाग ः गत वर्षीच्या तुलनेत २१ कोटी अधिक उत्पन्न
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ ः राज्यात सर्वसामन्यांची जीवनवाहिनी म्हणून एसटी बसेसकडे पाहिले जाते. त्यात राज्य शासनाने महिलांसाठी पन्नास टक्के सवलत, ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासासह विविध सवलती जाहीर केल्या आहेत. त्यामुळे यंदा कोल्हापूर विभागाने गेल्या तीन महिन्यांत दोन कोटी १६ लाख ४० हजार किलोमीटरचे अंतर पार केले असून, त्यातून ११८ कोटी ३३ लाख ४० हजारांची कमाई केली आहे. ही गेल्या वर्षीच्या तुलनेत २१ कोटी ५२ लाख ५३ हजारांनी अधिक आहे.
राज्य शासनाने महिलांच्या सन्मानार्थ प्रवासात ५० टक्के सवलत जाहीर केली आहे. त्यामुळे राज्यात असो वा जिल्हांतर्गत प्रवास असो त्याकरिता एसटीच्या लालपरीलाच प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नात दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. कोल्हापूर विभागातील बारा आगारांतून एकूण ७०० बसेस लाखो किलोमीटरचे अंतर रोज पार करून राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रवाशांना पोहचवितात. यासह ज्येष्ठांना मोफत प्रवास, दिव्यांग, विशेष आजार असलेल्या व्यक्ती, पत्रकार, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त खेळाडू आदींना सवलत जाहीर केली आहे. या सर्वांचे सवलत अनुदान सरकार महामंडळाला दर महिन्याला देते. त्यामुळे दिवसेंदिवस एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होऊ लागली आहे. त्यातूनच कोल्हापूर विभागातील बारा आगारांतील बसेसद्वारे गेल्या तीन महिन्यांत ११८ कोटी ३३ लाख ४० हजार किलोमीटरचे अंतर पार केले आहे. त्यातून ११८ कोटी ३३ लाख ८६ हजार इतके उत्पन्न मिळवले आहे. ही रक्कम गेल्या वर्षीच्या जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत मिळालेल्या रकमेपेक्षा २१ कोटी ५२ लाख रुपये इतका जादा मिळाली आहे. मागील वर्षी ९६ लाख ८१ लाख ३३ हजार इतके उत्पन्न मिळाले होते.
...
आगारनिहाय एकूण उत्पन्न असे ...
कोल्हापूर (सीबीएस) - २१ कोटी ९ लाख ११ हजार
संभाजीनगर - १२ कोटी २५ लाख २० हजार
गडहिंग्लज - १२ कोटी ३४ लाख ३० हजार
इचलकरंजी - १५ कोटी ६४ लाख ४ हजार
गारगोटी- १३ कोटी ३४ लाख १२ हजार
मलकापूर - ५ कोटी ७७ लाख ६४ हजार
चंदगड - ६ कोटी ९१ लाख १९ हजार
कुरुंदवाड - ६ कोटी ९८ लाख ४५
कागल - ९ कोटी २२ लाख ९३ हजार
राधानगरी- ७ कोटी ४० लाख ८१ हजार
गगनबावडा- २ कोटी ७ लाख ५६ हजार
आजरा - ५ कोटी २८ लाख ५२ हजार
...
उत्पन्नात कोल्हापूर सीबीएस अव्वल
गेल्या तीन महिन्यांत कोल्हापूर सीबीएस आगारातून बसेसनी ३६ लाख ८२ हजार किलोमीटरचे अंतर पार केले असून, त्यातून २१ कोटी ९ लाख ११ हजार इतके उत्पन्न मिळाले. हे उत्पन्न बारा आगारांत सर्वाधिक आहे.
...
‘राज्य शासनाकडून महिला सन्मान, ज्येष्ठ नागरिक आदी सवलत योजना जाहीर केल्या आहेत. त्याचा लाभ प्रवाशांना मिळत आहे. त्यातून विभागाला गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीपेक्षा यंदा २१ कोटी ५२ लाखांचे अधिकचे उत्पन्न मिळाले.’
- अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक, कोल्हापूर विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com