पाऊस १४ मे २०२४

पाऊस १४ मे २०२४

शहरात हुलकावणी तर सांगाव, बांबवडेत मुसळधार

कोल्हापूर, ता. १४ : सोसाट्याचा वारा, धुळीच्या वादळाने रस्ते माखले. जोरदार विजाही कडाडल्या. मात्र, वळीव पावसाने हुलकावणी दिली. जिल्ह्यातील ठरविक ठिकाणे वगळता कोल्हापूर शहर आणि परिसरात वळीव पावसाची प्रतीक्षा अजूनही संपलेली नाही.
जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून जोरदार वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. याउलट कोल्हापूर शहर आणि उपनगरांत अपेक्षित पाऊस झालेला नाही. आज सायंकाळी धुळीचे वादळ आणि विजांचा कडकडाट झाला. जोरदार आणि उष्ण वाऱ्यामुळे शहरात पाऊस होईल, असा अंदाज होता. मात्र, आजही वळीव पावसाने हुलकावणी दिली. पंधरा मिनिटांच्या वादळी वाऱ्यानंतर पुन्हा वातावरण शांत झाले.
...
कसबा सांगावला मुसळधार
कसबा सांगाव : येथे सायंकाळी सहाच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. दोन तास पडलेल्या वळीव पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. जोरदार वाऱ्यामुळे सुळकूड मार्गावरील तीन टेकडी ते दूधगंगानगर दरम्यान सहा ते आठ विद्युत वाहिन्यांचे खांब आणि मोठी झाडे उन्मळून पडली. यामुळे विद्युतपुरवठा खंडित झाला.
...
पिशवी येथे वादळी पावसामुळे नुकसान
बांबवडे : पिशवी (ता. शाहूवाडी) येथे वादळी पावसामुळे जीवनावश्यक वस्तूंसह घरांचे सुमारे १२ ते १३ लाखांचे नुकसान झाले. आज सायंकाळी पाच वा.च्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसाने पिशवी येथील घरांचे छप्पर उडून गेले. यात बारा लाखांचे नुकसान झाले. यात अजित आण्णासाहेब पाटील, बंडू रामचंद्र पाटील, पांडुरंग रामचंद्र पाटील, आनंदा गोपाळा पाटील, रामचंद्र नामदेव मगदूम, तानाजी धोंडिराम शिंदे , शिवाजी धोंडिराम शिंदे, संभाजी धोंडिराम शिंदे, शहाजी धोंडिराम पाटील, विजय महादेव पाटील, संजय महादेव पाटील यांचे नुकसान झाले. तानाजी धोंडिराम शिंदे यांच्या घराचे छप्पर उडून गेल्याने प्रापंचिक साहित्यासह घराचे मोठे नुकसान झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com