संभाजी महाराज यांना अभिवादन

संभाजी महाराज यांना अभिवादन

फोटो 83655, 83510

छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन
शहर परिसरातील संस्था, संघटना, मंडळांतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन


सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ : स्वच्छता मोहीम, प्रतिमा पूजन, व्याख्याने अशा वैविध्यपूर्ण उपक्रमांद्वारे छत्रपती संभाजी महाराज यांना आज अभिवादन करण्यात आले. शहर परिसरातील संस्था, संघटना, मंडळांतर्फे त्यांचे आयोजन करण्यात आले.
शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनाच्या प्रवेशद्वारात कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी जाधव, इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील, भूगोल अधिविभाग प्रमुख डॉ. जगदीश सपकाळे, डॉ. दत्तात्रय मचाले, डॉ. उमाकांत हत्तीकट उपस्थित होते.
शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळातर्फे उभा मारुती चौकतात माजी अध्यक्ष अजित खराडे यांनी प्रतिमेचे पूजन केले. यावेळी सौधन अपराध, रोहित मोरे, विशाल बोंगाळे, अक्षय मोरे, योगेश इंगवले, अभि इंगवले, राहुल जरग, रवींद्र साळुंखे, विजय माने, अभिषेक शिंदे, गोरख कुंभार, रामभाऊ साळोखे उपस्थित होते.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कोल्हापूर विभागीय केंद्राच्या कार्यालयात वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार प्राचार्य डॉ. आर. व्ही. कुलकर्णी यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. संभाजी महाराजांचे युद्ध कौशल्य, चातुर्य आणि त्यांनी लिहिलेल्या ग्रंथसंपदांची महत्त्वपूर्ण माहिती दिली. यावेळी वरिष्ठ सहायक संजय काटे, सहायक विजयसिंह रजपूत, दिगंबर गाडे, विजय शार्दूल, अमित व्हटकर, गायत्री पाटील, वैष्णवी चव्हाण, निकिता देसाई, अक्षय नाईक, धिरज लोखंडे, प्रशांत केसरकर उपस्थित होते.
राजर्षी तरुण मंडळ व छत्रपती शाहूराजे फाऊंडेशनतर्फे मिरजकर तिकटी येथे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन झाले. यावेळी बाबूराव जाधव, संपत जाधव, बाळासाहेब पाटील, बाबा पार्टे, निवास शिंदे, श्रीकांत माने, उमेश पोवार, जयकुमार शिंदे, संतोष महाडिक, सुशांत चव्हाण, विकी पोलादे, महेंद्र साळोखे उपस्थित होते. धर्मवीर १४ तर्फे बिंदू चौकात पुतळ्याचे पूजन झाले. सकाळपासूनच येथे शंभूप्रेमींची गर्दी होती. त्यांनी पुतळ्यासमवेत मोबाईलद्वारे सेल्फी घेतली.
-
शाश्वत प्रतिष्ठान
कोल्हापूर : येथील शाश्वत प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पापाची तिकटी येथील पुतळ्यास अभिवादन केले. उपाध्यक्ष राहुल चौधरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. अध्यक्ष डॉ. गुरुदत्त म्हाडगुत, संचालक अविनाश टकळे, निखिल जाधव, शिवनाथ पावसकर, मंदार शिंगणापूरकर, जयराज म्हाडगुत, शेखर वडिंगेकर, आदी उपस्थित होते.
-
महापालिका
कोल्हापूर : धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने रुईकर कॉलनी येथील पुतळ्यास उपायुक्त साधना पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कनिष्ठ अभियंता उमेश बागुल, तुषार भरसट, अनिल पाटील, अरुण जमादार, माधव निगवेकर, सुनील कांबळे, मदन भांदिगरे, शिवाजी पाटील उपस्थित होते.
-
सांगवडे परिसर
सांगवडे : क्रांतिवीर तरुण मंडळातर्फे अध्यक्ष अक्षय पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. पन्हाळ्यावरून कार्यकर्त्यांनी ज्योत आणली. गावात ज्योतीचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. सकाळी दहा वाजता महिलांनी पाळणा गायला. सायंकाळी सात वाजता नेरली येथील ३० धनगरी ढोलांच्या तालावर व निगवे येथील ३० मुलांनी मर्दानी खेळांची आकर्षक प्रात्यक्षिके दाखवून मिरवणुकीत रंगत आणली. पालखीत धर्मवीर संभाजी महाराजांची मूर्ती ठेवली होती. मिरवणूक मार्गावर आकर्षक रांगोळ्यांची पानाफुलांनी सजावट केली होती.
सांगवडेवाडी येथे संयुक्त धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्सव कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात अध्यक्ष प्रतीक खुडे यांच्या हस्ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पन्हाळ्यावरून आणलेल्या ज्योतीचे स्वागत गावात करण्यात आले. गावातून ज्योतीची मिरवणूक काढण्यात आली. सकाळी दहा वाजता महिलांनी पाळणा गायला आणि सुंठवडा वाटप करण्यात आला. विनायक गनमाळे, विशाल चव्हाण यांच्यासह उत्सव कमिटीतील कार्यकर्त्यांनी संयोजन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com