बेपत्ता मेकॅनिकचा मृतदेह सापडला

बेपत्ता मेकॅनिकचा मृतदेह सापडला

83733
बेपत्ता मेकॅनिकचा मृतदेह सापडला
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ : पंचगंगा नदीघाटावर तीन दिवसांपूर्वी कपडे मिळालेल्या बेपत्ता दुचाकी मेकॅनिकचा मृतदेह वडणगे गावच्या हद्दीत नदीपात्रात मिळून आला. अवधूत बाबासाहेब भोसले (वय ४४) असे मृताचे नाव आहे. सहा मे रोजी घरातून निघून गेल्यानंतर शनिवारी (ता. ११) रात्री नदीकाठावर कपडे मिळाल्याने त्याचा शोध सुरू होता.
भोसले हे बेपत्ता झाल्याची वर्दी राजारामपुरी पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली होती. पंचगंगा नदी घाटावर त्याचे कपडे आढळल्यानंतर नातलगांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. अग्निशमन दलाच्या मदतीने शोधमोहीम सुरू होती. बोटीतून शोध सुरू असताना आज वडणगे गावच्या हद्दीत सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. अग्निशामक दलाच्या जवानांसह जीवरक्षक दिनकर कांबळे, पिंटू निरंकारी, सागर मांडवकर, महेश जाधव, प्रदीप खाडे आदींनी त्यांचा शोध घेतला. अवधूत यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com