भडगावात भरली आठवणींची शाळा

भडगावात भरली आठवणींची शाळा

gad151.jpg
83803
भडगाव ः कल्लेश्वर हायस्कूलमधील १९८७ च्या बॅचमधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी स्नेहमेळाव्यात भाग घेतला होता.
-----------------------------------------------------------
भडगावात भरली आठवणींची शाळा
‘कल्लेश्वर’मध्ये स्नेहमेळावा ः ३७ वर्षांनी भेटले विद्यार्थी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १५ ः शाळेतले दिवस हे खरंच कमालीचे दिवस असतात. अर्थात त्यावेळी अभ्यासाचं ओझं वाटतं खरं; पण मोठं झाल्यानंतर मात्र त्या दिवसांची खरी किंमत कळते. तेव्हाचे प्रत्येक क्षण, गंमती-जमती, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, मित्र-मैत्रिणींसोबतचा रूसवा-फुगवा, लुटुपुटूची भांडणं या गोष्टी मनातल्या कप्प्यात घर करून राहतात. मग कधीतरी अचानक शाळेतला एखादा मित्र भेटला की, नकळतपणे बालपणीच्या त्या आठवणींमध्ये आपण हरवून जातो. असाच अनुभव भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील श्री कल्लेश्वर हायस्कूलच्या १९८७ मधील दहावीच्या बॅचमधील सवंगड्यांना आला.
या हायस्कूलमधून १९८७ मध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन करिअरच्या वेगवेगळ्या वाटा चोखाळल्यामुळे वेगळे झालेले वर्गमित्र आणि वर्गमैत्रिणी तब्बल ३७ वर्षांनी हायस्कूलमध्ये आयोजित माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यात एकत्र आले होते. या निमित्ताने हायस्कूलच्या मैदानात प्रदीर्घ वर्षांनंतर प्रथमच पाऊल टाकताना या सर्वांच्या काळजात कोरलेल्या आठवणींना उजाळा मिळाला. भावनिकता भरून राहिलेल्या या वातावरणात आत्यंतिक उत्साहाची भर पडली होती. यावेळी खेळीमेळीत स्नेहमेळावा झाला. मेळाव्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर, चिपळूण, निपाणी, चिक्कोडी, बेळगावसह विविध भागांतून सुमारे ४० माजी विद्यार्थी आले होते.
गडहिंग्लजचे माजी उपनगराध्यक्ष महेश ऊर्फ बंटी कोरी यांच्या हस्ते सर्वांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांचे भाषण झाले. माजी विद्यार्थिनींना माहेरवाशीणींचा बहुमान देत त्यांचा साडी व ओटी भरून गौरव केला. निवृत्त शिक्षक एस. डी. गुरव, एस. आर. कदम, लेखनिक सावेकर, गणपती कुंभार, बाबालाल मुल्ला यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन योगशिक्षिका सुरेखा कळसगोंडा यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com