कोळींद्रे- पोश्रातवाडी पुलाचे रुंदीकरण करा

कोळींद्रे- पोश्रातवाडी पुलाचे रुंदीकरण करा

ajr151.jpg.....
83832
आजरा ः कोळिंद्रे-पोश्रातवाडी पुलाच्या रुंदीकरणासाठी सार्वजनिक बांधकामचे अधिकारी यांना निवेदन देताना समाजसेवक नरसू शिंदे व पदाधिकारी.
-------------------------
कोळिंद्रे-पोश्रातवाडी पुलाचे रुंदीकरण करा
ग्रामस्थांची मागणी ः सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १५ ः कोळिंद्रे-पोश्रातवाडी दरम्यान तारओहळवर अरुंद पूल आहे. या पुलावरून वाहनांना बाजू देताना अपघात घडत आहेत. या पुलाचे रुंदीकरण करावे, अशी मागणी कोळिंद्रे-पोश्रातवाडीकरांनी केली आहे. याबाबतचे निवेदन समाजसेवक नरसू शिंदे, सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे, कोळिंद्रे-पोश्रातवाडी दरम्यान तारओहळवर अरुंद पूल आहे. वाहतुकीच्या दृष्टिकोनातून हा पूल वाहनधारकांना गैरसोयीचा झाला आहे. चारचाकी व दुचाकी वाहने पुलावरून चालवताना चालकाला कसरत करावी लागत आहे. हा पूल वाहतुकीच्या दृष्टिकोनातून धोकादायक बनला आहे. गत सहा महिन्यांत या पुलावर सुमारे पाच-सहा अपघात झाले आहेत. उचंगी प्रकल्प पूर्ण झाल्याने तारओहळ सध्या बारमाही वाहत आहे. त्यामुळे या ओढ्याला वर्षभर पाणी वाहत आहे. या पुलाला संरक्षक कठडा नाही. अरुंद पुलामुळे वाहनांना बाजू देताना वाहनचालकांची कसरत होते. येथे अपघात होत असल्याने पूल वाहतुकीला धोकादायक झाला आहे. तसेच या रस्त्यावर रहदारीही वाढली आहे. त्यामुळे या पुलाचे रुंदीकरण करावे, अशी मागणी केली आहे. निवेदनावर समाजसेवक नरसू शिंदे, आनंदा सुतार, अमर मटकर, भिकाजी गोंधळी, सुधाकर घोरपडे, शिवाजी भगुत्रे, सुरेश बुगडे यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com