नर्सिंग क्षेत्रातील सत्कार -डॉ.असोसिएशन

नर्सिंग क्षेत्रातील सत्कार -डॉ.असोसिएशन

83937
कोल्हापूर : मेडिकल असोसिएशन, जेरीयाट्रिक सोसायटी ऑफ इंडियातर्फे डॉ. संजय घोटणे यांच्या हस्ते भालचंद्र कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवर उपस्थित होते.

नर्सिंग क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार
मेडिकल असोसिएशनकडून आयोजन; ‘एक्सलेन्सी इन नर्सिंग ॲवॉर्ड’चेही वितरण
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ : नर्सिंग क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा विविध संस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. यासाठी कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, जेरीयाट्रिक सोसायटी ऑफ इंडिया कोल्हापूर चाप्टर आणि जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन कोल्हापूर यांनी पुढाकार घेतला. यावेळी प्राचार्य भालचंद्र कुलकर्णी, डॉ. एम. आय. मोमीन, प्राचार्य सुशीला के. लांबा, प्रा. रेजिना सातवेकर, डॉ. विशाल पवार, प्रा. मनीषा बिजापूरकर, डॉ. सरिता कदम, डॉ. निर्मला रत्नाकर यांना सन्मानित करण्यात आले.
परिचारिकांतर्फे केलेल्या उत्कृष्ट सेवेची दखल घेऊन ‘एक्सलेन्सी इन नर्सिंग’ या डॉ. एस. के. कुलकर्णी स्मृती ॲवॉर्ड मिलिंद बाबूराव कुलकर्णी, पद्मा नारायण माळी, विद्या भोसले, माधवी रूकडीकर, हर्षदा रवींद्र हारळकर यांना देण्यात आले. याचे वितरण डॉ. शिरीष कुलकर्णी व डॉ. सुलभा कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. नर्सिंग विषयावर व्याख्यानेही झाली.
जेरियाट्रिक सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. संजय घोटणे, कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अमोल कोडोलीकर, जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अरुण धुमाळे, डॉ. महावीर मिठारी, डॉ. शीतल देसाई, डॉ. गुणाजी नलवडे, डॉ. विश्‍वनाथ मगदूम यांनी नियोजन केले. डॉ. मनीषा बागवडे यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com