‘आयडीयल स्ट्राईकर’ विजेता

‘आयडीयल स्ट्राईकर’ विजेता

83910
कोल्हापूर ः क्रिडाई क्रिकेट स्पर्धेतील आयडीयल स्ट्राईकर विरुद्ध किवेस्ट चॅलेंजर यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यापूर्वी मान्यवरांच्या उपस्थितीत नाणेफेक झाली.
......
‘आयडीयल स्ट्राईकर’ विजेता

क्रिडाई क्रिकेट लीग स्पर्धा ः सहा संघांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ ः क्रिडाई कोल्हापूरतर्फे आयोजित क्रिडाई क्रिकेट लीग स्पर्धेच्या अंतिम लढतीत आयडीयल स्ट्राईकर संघाने किवेस्ट चॅलेंजरचा पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली.
कळंबा स्पोर्टस् कॅशल टर्फ मैदानावर झालेल्या या स्पर्धेत बेडेकर ब्रेव्हहार्टस, कृष्णा वॉरियर्स, किवेस्ट चॅलेंजर, श्री चॅम्पियन, आयडीयल स्ट्राईकर, एस.पी. सुपरकिंग अशा सहा संघांनी सहभाग नोंदविला. प्रत्येक संघात सात खेळाडूंचा समावेश होता. साखळी पद्धतीने झालेल्या या स्पर्धेतून आयडीयल स्ट्राईकर व किवेस्ट चॅलेंजर संघात अंतिम लढत झाली. त्यामध्ये आयडीयलने वर्चस्व राखत विजेतेपदाला गवसणी घातली.
विजेत्या संघाचा कर्णधार व संघाला क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खेत यांच्या हस्ते व उपाध्यक्ष सचिन ओसवाल, उपाध्यक्ष गौतम परमार, सचिव संदीप मिरजकर व सहखजानिस सचिन परांजपे यांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी ज्येष्ठ सभासद कृष्णा पाटील, शाम नोतानी, खजानिस अजय डोईजड, सहसचिव गणेश सावंत, सोमराज देशमुख, मॅनेजिंग कमिटी सदस्य विजय माणगावकर, लक्ष्मीकांत चौगुले, श्रीराम पाटील, आदित्य बेडेकर, विश्‍वजित जाधव, दीपक वागुळे, संदीप पोवार, नंदकिशोर पाटील, अमोल देशपांडे, क्रिडाई कोल्हापूरचे माजी अध्यक्ष महेश यादव, शंकर गावडे, विलास रेडेकर, धोंडिराम रेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
............

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com