केएसए. ‘सी’ डिव्हिजन फुटबॉल लीग सोमवारपासून

केएसए. ‘सी’ डिव्हिजन फुटबॉल लीग सोमवारपासून

संग्रहित फुटबॉल फोटो टाकणे...
....................
केएसए. ‘सी’ डिव्हिजन फुटबॉल लीग सोमवारपासून

रोज सरासरी १४ सामने होणार ः पोलिसांकडून नियमावली जाहीर

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ ः शाहू छत्रपती के.एस.ए. ‘सी’ डिव्हिजन लीग फुटबॉल स्पर्धेला सोमवार (दि.२०) पासून प्रारंभ होत आहेत. २० ते २७ मे दरम्यान रोज सरासरी १४ असे एकूण १११ सामने होणार आहेत.
छत्रपती शाहू स्टेडियम व पोलो मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेत नोंदणीकृत ७५ संघांची १९ गटांत विभागणी केली आहे. या गटांतर्गत स्वतंत्रपणे लीग पद्धतीने सामने होणार आहेत. १९ गटांतून गुणानुक्रमे पहिला संघ असे १९ संघांमध्ये बाद पद्धतीचे सामने होतील. बाद फेरीतील विजेता व उपविजेता हे दोन संघ याचवर्षी के.एस.ए. ‘बी’ डिव्हिजन गटासाठी पात्र ठरणार आहेत, अशी माहिती के.एस.ए.तर्फे मानद फुटबॉल सचिव राजेंद्र दळवी व ‘सी’ लीगप्रमुख दीपक घोडके यांनी पत्रकाद्वारे दिली.
.....
आक्षेपार्ह मजूकर अपलोड केल्यास कारवाई
के.एस.ए. पंच, सामना अधिकारी, रेफ्री ॲसेसर, संघ व खेळाडू आदींबाबत सर्व प्रकारच्या सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचा आक्षेपार्ह मजकूर अपलोड केल्यास अशा संघासह पदाधिकाऱ्यांवर दंडासह कठोर कारवाई केली जाणार आहे.
.....
पोलिसांचीही नियमावली जाहीर
सहभागी होणाऱ्या संघाचे नाव, खेळाडू, पदाधिकारी यांच्या नावाची यादी सादर करणे आवश्‍यक केले आहे. सामन्यादरम्यान वादावादी झाल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. के.एस.ए. कार्यालयासह प्रेक्षक गॅलरी हुल्लडबाजी करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी उच्च प्रतीचे सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना केल्या आहेत. ज्या खेळाडूंवर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत, त्यांना स्थानिक पोलिस ठाण्याकडून वर्तवणुकीचा दाखला घेऊन के.एस.ए.कडे सादर करण्याची सूचना आली आहे. पोलिसांच्या सूचना संघ पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंना समजून सांगाव्यात, असेही आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
............
पहिल्या दिवशीचे (२० मे) सामने असे ः
पोलो मैदान ः सकाळी ७ वा. रामानंदनगर फुटबॉल क्लब विरुद्ध श्रीकृष्ण फुटबॉल क्लब (बी), ८ वा. रॅश ग्रुप विरुद्ध बालगोपाल तालीम (बी), ९ वा. यादवनगर फुटबॉल क्लब विरुद्ध अनिल मंडलिक स्पोर्टस् (ए), दुपारी ३ वा. अयोध्या मित्रमंडळ विरुद्ध जोतिबा तालीम मंडळ, दुपारी ४ वा. स्पार्टन्स स्पोर्टस् विरुद्ध आकाश मित्र मंडळ, ५ वा. ब्रह्मपुरी फुटबॉल क्लब विरुद्ध खंडोबा तालीम (सी).

छत्रपती शाहू स्टेडियम ः सकाळी ७ वा. - शालिनी पॅलेस मित्र मंडळ विरुद्ध श्री महागणपती ग्रुप, स. ८ वा. टायसन फुटबॉल क्लब विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ (ब), स. ९ वा. - संयुक्त जुना बुधवार पेठ (बी) विरुद्ध राजर्षी शाहू स्पोर्टस्, स. १० वा. - भारतनगर फुटबॉल क्लब विरुद्ध आर. एस. फुटबॉल क्लब, दुपारी २ वा. - पॅट्रीयट स्पोर्टस विरुद्ध एस. जी.ग्रु प, दु. ३ वा. - हनुमान तालीम मंडळ विरुद्ध बावडा फुटबॉल क्लब (बी), दु. ४ वा. - राजे स्पोर्टस् विरुद्ध संयुक्त शाहूपुरी (ए), सायंकाळी ५ वा. - श्रीकृष्ण फुटबॉल क्लब विरुद्ध घिसाड गल्ली फुटबॉल क्लब यांच्यात होणार आहे.
..........

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com