तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे....

तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे....

तुमच्या मुलाला आम्ही पकडले आहे...
व्हॉटसॲप कॉल्सनी वाढवली चिंता; पैशांची मागणी झाल्यास व्हा सावध

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ ः तुमच्या मुलाला आम्ही पकडले आहे, त्याचा आवाज ऐका, असे कॉलवरून सांगितले जाते.... समोरून एखाद्या मुलाचा रडण्याचा आवाज कानावर पडतो.... काही वेळात त्याच्याकडून वेगवेगळ्या मागण्या होतात. नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणी असणारे पालक चिंतेत पडतात. व्हॉटसॲपवर येणाऱ्या फसव्या कॉलमुळे अनेक पालकांची घालमेल सध्या सुरू आहे.
पुण्यातील आयटीमध्ये जॉब करणारी विदुला (नावात बदल केला आहे) काम संपवून रात्री उशिरा तिच्या घरी येते. तिचे पालक कोल्हापुरात राहण्यास आहेत. विदुलाचे आणि आईचे रोजचे बोलणे होते. मात्र, ती काम संपवून घरी परताना घरच्यांना कॉल करते. एकेदिवशी अचानक एक कॉल आईच्या फोनवर आला. तिकडून बोलणाऱ्या व्यक्तीने तुमची मुलगी आमच्याजवळ आहे, तिच्याशी बोला असे सुनावले. मग, एका मुलीला रडण्याचा आवाज ऐकून विदुलाच्या आईचे अवसान गळाले. आपल्या मुलीचे काही बरे वाईट झाले तर अशा चिंतेत आईने मुलीच्या मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण, कामात असल्याने तिने उचलला नाही. आईची चिंता आणखी वाढली. आईने तो कॉल येत असतानाच काही नातेवाईकांशी संपर्क केला असता पुण्यातील अनेकांना असे फसवे कॉल येत असल्याचे समोर आले.
बुधवारी कोल्हापुरातही असाच एक कॉल सुहास (नावात बदल) यांच्या मोबाईलवर आला. तुम्हारा बेटा हमारे पास है, उससे बात करो, असे बोलणाऱ्याने एका मुलाचा रडण्याचा आवाज ऐकवला. सुहास यांनी हा कॉल कट करून तातडीने घरी खातरजमा केली. मुलगा घरीच असल्याचे समजले. मग मात्र सुहास यांनी त्या व्हॉटसॲप नंबरवरील व्यक्तीचा कोल्हापुरी शब्दात समाचार घेतला.

चौकट
पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन
व्हॉटसॲपवर येणारे हे कॉल फसवे असले तरी काही वेळासाठी पालकांच्या मनात धस्स झाल्याशिवाय राहात नाही. अशी भीती घालून पोलिस खात्याची कारवाई टाळण्यासाठी आणि मुलाला सोडण्यासाठी पैशांची मागणी होत असल्याचे प्रकार घडत आहेत. असा फसव्या कॉलपासून वेळीच सावध राहणे गरजेचे आहे. अशाप्रकारचे कोणतेही कॉल आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com