अपघातात एक ठार

अपघातात एक ठार

chd155.jpg मारुती कुट्रे 83931

पाटणे फाट्याजवळील
अपघातात एक ठार

सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १५ : बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर पाटणे फाटा (ता. चंदगड) नजीक मोटार व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एक ठार, तर एक जखमी झाला. मारुती रामू कुट्रे ( वय ६५) असे मृताचे नाव असून, पुंडलिक कांबळे (दोघेही रा. बसर्गे, ता. चंदगड ) जखमी आहेत. यांच्यावर बेळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला.
कुट्रे व कांबळे हे जंगमहट्टी (ता. चंदगड) येथे दुचाकीवरून (एमएच ०९ एफजी १३९७) यात्रेसाठी गेले होते. तेथून ते गावाकडे परत येत होते. पाटणे फाटा येथे समोरून येणाऱ्या मोटारीला (एचआर ८५ ए ८९९५) समोरून धडक झाली. यात कुट्रे जागीच ठार झाले. कांबळे गंभीर जखमी झाले. ते कोतवाल म्हणून काम करतात. त्यांना तातडीने बेळगाव येथील रुग्णालयात हलवले. मुख्य मार्गावरच हा अपघात झाल्याने मोठी गर्दी झाली. काही काळ वाहतूक ठप्प झाली. दरम्यान, मृत कुट्रे हे बसर्गे येथील भावेश्वरी विकास सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष होते. माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून परिचित होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, दोन भाऊ, सुना, जावई, नातवंडे, भावजया असा परिवार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com