गुणवत्तावृद्धीत माजी विद्यार्थ्यांचे योगदान

गुणवत्तावृद्धीत माजी विद्यार्थ्यांचे योगदान

gad165.jpg
83972
गडहिंग्लज ः माजी विद्यार्थी महामेळाव्याचे वृक्षाला जलार्पण करून डॉ. सतीश घाळी यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. यावेळी महेश देवगोंडा, विकास पाटील, गजेंद्र बंदी, शिवानंद मस्ती, दत्ता पाटील उपस्थित होते.
---------------------------------------------------
गुणवत्तावृद्धीत माजी विद्यार्थ्यांचे योगदान
डॉ. सतीश घाळी ः घाळी कॉलेजमध्ये माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १६ ः महाविद्यालयाच्या गुणवत्ता वृद्धीमध्ये माजी विद्यार्थ्यांचे योगदान मोठे असते, असे मत विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी यांनी व्यक्त केले.
येथील डॉ. घाळी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी असोसिएशनतर्फे आयोजित माजी विद्यार्थी महामेळाव्यात ते बोलत होते. डॉ. घाळी म्हणाले, ‘माजी विद्यार्थी हे त्या महाविद्यालयाचे ज्ञानभांडार असतात. शिवाय महाविद्यालयाची प्रतिष्ठा असते. करिअरनिमित्त माजी विद्यार्थी सार्वजनिक जीवनात वावरत असतात. त्यांना आलेले अनुभव, त्या अनुषंगाने संपादित केलेले ज्ञान, माहिती व त्याआधारे त्यांच्यात निर्माण झालेली निरीक्षणशक्ती याचा उपयोग महाविद्यालयाला होतो. माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या गुणवत्ता वृद्धीमध्ये त्याचा उपयोग करावा.’
असोसिएशनचे अध्यक्ष महेश देवगोंडा, सदस्य सागर पाटील, प्रशांत कित्तूरकर, संतोष चिक्कोडे, डॉ. सचिन कोडोली, आप्पासाहेब पाटील यांची भाषणे झाली. संस्थेचे सचिव अॅड. बी. जी. भोसकी, उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर, सहसचिव गजेंद्र बंदी, संचालक अॅड. विकास पाटील, महेश घाळी आदी उपस्थित होते. अमोल देवगोंडा यांनी स्वागत केले. डॉ. दत्ता पाटील यांनी प्रास्ताविक केले. किरण पाटील यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com