रिंगरोडवर लाकूडफाटा, गवताच्या गंज्या

रिंगरोडवर लाकूडफाटा, गवताच्या गंज्या

chd164.jpg
84016
चंदगड : रिंगरोडवर वर्दळ नसल्यामुळे लाकूडफाटा आणि गवतगंज्या रचण्यासाठी वापर होत आहे.
-----------------------
रिंगरोडवर लाकूडफाटा, गवताच्या गंज्या
चंदगडच्या बाजारपेठेत वाहतूक कोंडी नित्याची; पोलिस प्रशासनाकडून नियोजनाची गरज
सुनील कोंडुसकर : सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १६ : शहरातील वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून रिंगरोडची निर्मिती झाली. मात्र, वाहनधारकांकडून या रस्त्याचा वापर केला जात नसल्याने हा रस्ता सुनसान तर बाजारपेठेत कोंडी असे चित्र कायम आहे. नागरिकांकडून रस्त्याच्या कडेच्‍या जागेचा लाकूडफाटा आणि गवतगंज्या रचून ठेवण्यासाठी वापर होत आहे. याबाबत पोलिस प्रशासनाने नियोजन राबवण्याची गरज आहे.
कोकण आणि गोव्याला जोडणारा रस्ता चंदगड मुख्य बाजारपेठेतून जातो. पूर्वी वाहनांची संख्या मर्यादित होती. त्यावेळी वाहतुकीला अडचण नव्हती. मात्र, अलीकडे दुचाकी व खासगी चारचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दैनंदिन प्रापंचिक साहित्य खरेदी, वैद्यकीय सेवा, बॅंका, पतसंस्थांतील व्यवहार करण्यासाठी येणारे नागरिक रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करतात. त्यामुळे मुळातच अरुंद असलेल्या रस्त्याचा मोठा भाग व्यापला जातो. एसटी, डंपरसारखी वाहने आल्यास त्यांना बाजू देण्यासाठीही जागा शिल्लक राहत नाही. त्यामुळे दीर्घकाळ वाहतूक कोंडी होते. मांडदेव चौक, कैलास चौक येथेही अशीच अवस्था होते. अलीकडे शहरातील वाहतूक कोंडीचा हा प्रश्न गंभीर झाला आहे. याबाबत रिंगरोडचा वापर करून एकेरी वाहतूक केल्यास हा प्रश्न सुटू शकतो. सुरुवातीला गुरुवार आठवडा बाजार दिवशी ही संकल्पना राबवून वाहनधारकांना या रस्त्याची सवय लावणे गरजेचे आहे. बाजारपेठेतील रुंदीकरण करणे शक्य नसल्यास नियमित एकेरी वाहतूक हाच पर्याय ठरू शकतो. या संदर्भात पोलिसांनी स्थानिक नागरिकांना विश्‍वासात घेऊन ही उपाययोजना अंमलात आणल्यास बाजारपेठेतील वाहतूक कोंडीवर मात करता येईल.
--------------------
रिंगरोडचा वापर करण्याची वाहनधारकांची मानसिकता तयार करणे गरजेचे आहे. बाजारपेठेतील कोंडी कमी करण्यासाठी रिंगरोडवरून एकेरी वाहतूक सुरू केल्यास उत्तम पर्याय होऊ शकतो.
- विवेक सबनीस, नागरिक, चंदगड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com