इचलकरंजीत पंधरा ‘लेटकमर’ना नोटीस

इचलकरंजीत पंधरा ‘लेटकमर’ना नोटीस

इचलकरंजीत पंधरा ‘लेटकमर’ना नोटीस
उपायुक्त काटकर यांची महापालिकेच्या विविध विभागांना भेट
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १६ : लोकसभा निवडणुकीनंतर महापालिकेतील प्रशासकीय कामकाजाला अद्याप शिस्त लागली नसल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी उपायुक्त प्रसाद काटकर यांनी सर्व विभागांत पाहणी केली होती. त्यावेळी अनेक अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत उपस्थित नसल्याचे दिसून आले. अशा १५ जणांना आस्थापना विभागाकडून खुलासा करण्याच्या नोटिसा काढल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी महापालिकेचे बहुतांश कर्मचारी नियुक्त केले होते. त्यामुळे महापालिकेचे प्रशासकीय कामकाज पूर्णतः विस्कळीत झाले होते. मतदान झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांना निवडणूक कामाच्या जबाबदारीतून मुक्त केले आहे. मात्र, त्यानंतरही अनेक कर्मचारी निवडणूक विभागाचे काम असल्याचे सांगून महापालिकेत उपस्‍थित राहण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. याबाबत उपायुक्त काटकर यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्य प्रशासकीय इमारतीतील सर्वच विभागांची पाहणी केली. त्यावेळी अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याचे दिसून आले. ही बाब गांभीर्याने घेतली आहे. त्यांना तूर्त नोटिसा काढल्या आहेत. पुढील टप्प्यात दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
-----
भरारी पथक बरखास्त?
प्रशासकीय कामकाजास शिस्त लागण्यासाठी तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी भरारी पथकाची नियुक्ती केली होती. याची अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कमालीची धास्ती घेतली होती. अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली होती. मात्र, अलीकडे अशा प्रकारची कारवाई थांबली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भरारी पथक बरखास्त केल्याची चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com