कनाननगरात महिलेस मारहाण ः २२ जणांवर गुन्हा

कनाननगरात महिलेस मारहाण ः २२ जणांवर गुन्हा

कनाननगरात
महिलेस मारहाण;
२२ जणांवर गुन्हा

कोल्हापूर ः आईला मारहाण केल्याची विचारणा केल्याच्या रागातून उज्‍ज्वला शिवाजी चव्हाण (वय ३५, रा. कनाननगर) यांना नातेवाइकांकडून मारहाण करण्यात आली. फिर्यादी या दिव्यांग असतानाही त्यांना मारहाण केल्याप्रकरणी २२ संशयितांविरोधात दिव्यांगजन अधिकार अधिनियम कायद्यानुसार शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये रंजना साळुंखे, रेखा साळुंखे, कमल साळुंखे, मोनिका साळुंखे, पूजा पोवार, भारत साळुंखे, लक्ष्मी साळुंखे अशांसह २२ जणांचा समावेश आहे.
....

बेकायदा जमाव
केल्याप्रकरणी
१३ जणांवर गुन्हा

कोल्हापूर, ता. १६ ः शास्त्रीनगरात दुचाकी मेकॅनिक अवधूत भोसले ६ मेपासून बेपत्ता होता. त्याचा शोध सुरू असताना मंगळवारी वडणगे गावच्या हद्दीत त्याचा मृतदेह सापडला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याच्या गैरसमजातून नातेवाईक, मित्रांनी राजारामपुरी पोलिस ठाण्याबाहेर गर्दी केली होती. बेकायदा गर्दी केल्याप्रकरणी १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com