टस्कराचा बंदोबस्त करावा

टस्कराचा बंदोबस्त करावा

ajr163.jpg....
84069
आजरा ः येथील वनविभागाचे अधिकाऱ्यांना निवेदन देताना संभाजी पाटील, युवराज पोवार आदी.
-------------------------
टस्कराचा बंदोबस्त करावा
शिवसेनेची मागणी ः वनविभागाला निवेदन
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १६ ः मसोली भागात टस्कर हत्तीने धुडगूस घातला आहे. त्याने शेतकऱ्यांची वाहने व पिकाचे नुकसान केले आहे. वनविभागाने त्याचा बंदोबस्त करावा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाने केली आहे. याबाबतचे निवेदन आजऱ्याचे परिक्षेत्र वनाधिकारी यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे, तालुक्यात मसोली परिसरात टस्कराचा वावर आहे. त्याने ट्रॅक्टर, भुईमूग व पाण्याची पाईपलाईन यांचे मोठे नुकसान केले आहे. शेतकरी व नागरिक टस्कराच्या उपद्रवाने हैराण झालेले आहेत. संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून तत्काळ त्यांना नुकसानभरपाई रक्कम द्यावी. तसेच टस्कर व गवे यांच्या बंदोबस्तासाठी ठोस उपाययोजना राबवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अन्यथा वनविभागाच्या कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. निवेदनावर शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुकाप्रमुख युवराज पोवार, शहरप्रमुख ओमकार माद्याळकर, सुयश पाल, अमित गुरव, सागर नाईक, हरिशचंद्र व्हरकटे, उतम नार्वेकर, अथर्व कांबळे, प्रसाद कांबळे यांच्या सह्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com