पहिल्या दिवशी ७३९ विद्यार्थ्यांनी दिली प्रवेश परीक्षा

पहिल्या दिवशी ७३९ विद्यार्थ्यांनी दिली प्रवेश परीक्षा

पहिल्या दिवशी ७३९ विद्यार्थ्यांनी दिली प्रवेश परीक्षा
शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजन; सहा अभ्यासक्रमांचा समावेश

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ ः शिवाजी विद्यापीठातील अधिविभाग आणि संलग्नित महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांना नियमित प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा आजपासून सुरू झाली. त्यात पहिल्या दिवशी सहा अभ्यासक्रमांसाठी ७३९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यांचे प्रमाण ९१.१ टक्के होते. ऑफलाईन स्वरुपात परीक्षा घेण्यात आली.
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील एकूण १६ केंद्रांवर विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा रविवार (ता. १९) पर्यंत चालणार आहेत. त्याच्या पहिल्या दिवशी आज एम. एस्सी. स्टॅटेस्टिक/अप्लाईड स्टॅटेस्टिक अँड इर्न्फेमेशन, एम. एस्सी. बॉटनी, एम. एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स, बी. लिब अँड इन्फर्मेशन सायन्स, एमएसडब्ल्यू (रुरल कम्युनिटी डेव्हलपमेंट), एम. एस्सी. बायोकेमिस्ट्री/बायोटेक्नॉलॉजी/मेडिकल इन्फर्मेशन मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांसाठी परीक्षा झाली. ओएमआर शीटवर एमसीक्यू पद्धतीने सकाळी साडेदहा ते दुपारी बारा, दुपारी एक ते अडीच, दुपारी साडेतीन आणि सायंकाळी पाच या सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी एकूण ८१२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७३९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर ७३ जण अनुपस्थित राहिले.
दरम्यान, इतर दहा अभ्यासक्रमांच्या वर्णनात्मक स्वरुपात परीक्षा झाली. एकूण ३ हजार ८९५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर २८७ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. परीक्षा व मूल्यमापन मंडळाने आजअखेर ४२० अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा निकाल जाहीर केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com