बेकायदेशीर भरपूर

बेकायदेशीर भरपूर

परवानगीपेक्षा मोठी
होर्डिंग्ज अनधिकृत
तपासणीत उघड; महापालिकेची मोहीम
कोल्हापूर, ता. १६ : महापालिकेकडे असलेल्या परवानगीपेक्षाही अनेक मोठी होर्डिंग्ज अनधिकृत असल्याचे तपासणीत आढळून येत आहे. तसेच परवानगीच्या आडून कुणी जादा उभी केली आहेत का याचीही तपासणी केली जात आहे. आतापर्यंत याकडे लक्ष दिले नसल्याचेच स्पष्ट होत आहे.
शहरातील अनेक इमारतींवर होर्डिंग्ज आहेत. ती लोखंडी स्ट्रक्चरवर बसवली आहेत. तसेच अनेक उंच इमारतींवरही स्ट्रक्चरच्या आधारे उभी केली आहेत. मुंबईतील दुर्घटनेत परवानगी असलेले होर्डिंग्ज पडल्याने कधी, कशाची वेळ येईल हे सांगता येत नसल्याची नागरिकांत चर्चा आहे. बहुतांश होर्डिंग्ज रस्त्याशेजारी आहेत. त्यामुळे महापालिकेने अनधिकृत होर्डिंग्ज तपासणीची मोहीम सुरू केली असली तरी त्यापेक्षा आणखी काय घडले आहे याचाही शोध महापालिकेतर्फे घेतला जात आहे. त्यात परवानगीची व प्रत्यक्ष जागेवरील स्थिती तपासली जात आहे. त्यामुळे घराच्या बांधकामाप्रमाणे वाढीव काम झाले आहे का याचा शोध घेतला जात आहे.
एकाच ठिकाणी दोन, तीन होर्डिंग्ज एकावर एक लावण्याच्या प्रकाराचीही छाननी होत आहे. वर्दळीची ठिकाणे असल्याने तिथे साहजिकच मागणी होत असते. त्यासाठी इस्टेट विभागाकडून कशी परवानगी दिली आहे, प्रत्यक्षात काय आहे हे पाहिले जात आहे. तसेच परवानगी असलेल्या होर्डिंग्जचे स्ट्रक्चर स्टॅबिलिटी प्रमाणपत्र मागितले आहे. त्यानंतर होणाऱ्या घटनेस संबंधित होर्डिंग्जधारक असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे होर्डिंग्जधारकांनीही काळजी करण्यासारखी स्थिती आहे.
--------------
84118
कोल्हापूर ः हॉकी स्टेडियमजवळील अनधिकृत होर्डिंग्ज मालकांनी स्वतःहून उतरवून घेतले.

चार अनधिकृत होर्डिंग्ज काढले
इस्टेट विभागाने आज आणखी पाच अनधिकृत होर्डिंग्जधारकांना नोटीस दिली आहे. तसेच १० बाय १० चे चार अनधिकृत होर्डिंग्ज काढले. काल नोटीस लागू केलेल्या हॉकी स्टेडियम येथील अनधिकृत ४० बाय २० चे होर्डिंग्ज मालकांनी स्वतःहून उतरवून घेतले. आरोग्य निरीक्षकांमार्फत शहरामध्ये सर्व्हे करण्यात येणार असून विनापरवाना होर्डिंग तसेच परवानाधारक होर्डिंग यांची तपासणी करण्यात येणार आहे. सर्व्हेचे आदेश अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com