धनगरी ढोळ स्पर्धा

धनगरी ढोळ स्पर्धा

धनगरी ढोल स्पर्धेत
उचगावमधील
मंडळ प्रथम
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ : छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त राजारामपुरीतील विवेकानंद मित्र मंडळाने आयोजित केलेल्या धनगरी ढोल स्पर्धेत उचगावमधील मंगराया वालूक मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेचे हे पाचवे वर्षे आहे. यावेळी माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, महेश उत्तुरे हे प्रमुख पाहुणे होते.
हणुमंतवाडी येथील घोडेगिरी म्हसोबा वालूक मंडळाने द्वितीय, गडमुडशिंगी येथील धूळ सिद्ध बिरदेव वालूक मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला. चौथा व पाचवा क्रमांक अनुक्रमे घुणकीतील मंगोबा वालूक मंडळ व चंदुरच्या महा सिद्ध वालूक मंडळाला मिळाला. यावेळी रघुनाथ टिपुगडे, सनराज शिंदे, अमित व्हरांबळे, धैर्यशील देसाई, अभिषेक यादव, सागर दळवी, राहुल कोथमिरे, प्रसाद पिसे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com