शिवाजीनगर पोलिस ठाण्याचा हवालदार निलंबित

शिवाजीनगर पोलिस ठाण्याचा हवालदार निलंबित

शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे
हवालदार सागर शिंदे निलंबित

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ ः कर्तव्यात कसुरीचा ठपका ठेवत शिवाजीनगर पोलिस ठाण्याचा पोलिस हवालदार सागर शहाजी शिंदे याला निलंबित करण्यात आले. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी बुधवारी केलेल्या कारवाईची दबक्या आवाजात चर्चा होती. गुरुवारी याला दुजोरा देण्यात आला.
महामार्ग पोलिस कार्यालयाकडून गतवर्षी शिवाजीनगरकडे आलेल्या शिंदेच्या कामाबाबत नाराजी होती. त्याच्या कामातील कसुरीबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावून त्याची खातेअंतर्गत चौकशीही करण्यात आली. याचा अहवाल प्राप्त होताच पोलिस अधीक्षकांनी ही कारवाई केली. तसेच तातडीने पोलिस मुख्यालयात हजर होण्याचा आदेशही देण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com