Appasaheb Nalawade Gadhinglaj Cooperative Sugar Factory
Appasaheb Nalawade Gadhinglaj Cooperative Sugar Factoryesakal

'गोडसाखर' चालवायला देणे म्हणजे सभासदांचा विश्वासघातच; शरद पवार गट करणार तीव्र आंदोलन!

मोठ्या विश्वासाने सभासदांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाकडे एक हाती सत्ता सोपविली आहे.
Summary

निम्म्या पगारावर पोटाला चिमटा लावून काम करणाऱ्या कामगारांचाही विश्वास संचालक मंडळाने गमावला आहे.

गडहिंग्लज : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना (गोडसाखर) भाडेतत्त्‍वावर चालविण्यास देणे म्हणजे तालुक्यातील सभासद व शेतकऱ्यांचा (Farmers) विश्वासघातच करण्याचा प्रकार आहे, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दिलेल्या निवेदनातून व्यक्त केले आहे. कारखाना (Appasaheb Nalawade Gadhinglaj Sugar Factory) सहकारातच चालवावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे, कारखाना सहकारात चालवावा आणि त्याला गतवैभव मिळावे म्हणून मोठ्या विश्वासाने सभासदांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाकडे सभासदांनी एक हाती सत्ता सोपविली आहे. गतवर्षीचा गळीत हंगाम चालू करण्यासाठी केडीसीसी बॅंकेने ५५ कोटींचे अर्थसहाय्य दिले. यांसह साखर निर्यात अनुदान, शिल्लक मोलॅसिस, स्क्रॅप विक्रीतून अंदाजे ६० कोटींचे भांडवल हातात असतानाही कारखाना सुरळीत चालवता आला नाही. यामुळे कारखाना कोट्यवधींच्या कर्जात गेला.

Appasaheb Nalawade Gadhinglaj Cooperative Sugar Factory
Milk Collection : दूध संकलनात तब्बल सव्वातीन लाख लिटरची घट; शेतकऱ्यांना प्रतिदिन 1.25 कोटींचा फटका

या दोन्ही गोष्टींना अध्यक्ष व संचालक मंडळ जबाबदार आहे. शनिवारी (ता. १८) होणाऱ्या संचालक मंडळ बैठकीत कारखाना चालवायला देण्याबाबत चर्चा होणार असल्याचे समजते. तसे करणे म्हणजे सभासदांचा विश्वासघात आहे. निम्म्या पगारावर पोटाला चिमटा लावून काम करणाऱ्या कामगारांचाही विश्वास संचालक मंडळाने गमावला आहे. केडीसीसीचे अर्थसहाय्य, चांगल्या रिकव्हरीचा ऊस मुबलक असूनही कारखाना चांगला चालवणे संचालक मंडळाला जमले नाही.

यामुळे संचालकांनी राजीनामा द्यावा व कारखाना सहकारात चालवण्यासाठी सभासदांकडे सोपवावा, अशी मागणी आहे. माजी संचालक अमर चव्हाण, शिवप्रसाद तेली, शिवाजी माने, राम वळतकर, विकास पाटील, अजित कोरी, अंकुश रणदिवे, शिवाजी राऊत, भाग्योदय पाटील आदींच्या शिष्टमंडळाने अध्यक्षांना निवेदन दिले आहे.

Appasaheb Nalawade Gadhinglaj Cooperative Sugar Factory
Kolhapur Lok Sabha : दुपारनंतरच होणार निकालाचे चित्र स्पष्ट; 'राधानगरी'त होणार सर्वाधिक 30 फेऱ्या, मतमोजणीसाठी 504 कर्मचारी

संस्थांच्या ठेवी द्याव्यात ...

२०२१-२२ चा गळीत हंगाम सुरू करणे आर्थिक अडचणीमुळे कठीण झाले. केडीसीसीसह इतर बॅंकांनी कर्ज दिले नाही. यामुळे कारखाना सुरू व्हावा, या स्वच्छ भावनेतून तालुक्यातील काही सहकारी संस्थांनी दोन कोटी २० लाखांच्या ठेवी दिल्या. तोडणी-ओढणी वाहतूकदारांना कारखान्याचे हमीपत्र घेऊन भडगावच्या महालक्ष्मी पतसंस्थेने कर्ज दिले आहे. अद्याप ही रक्कम कारखान्याने दिलेली नाही. परिणामी वाहतूकदारांकडे वसुलीसाठी तगादा सुरू आहे. वारंवार पाठपुरावा करूनही कारखान्याकडे पैसे असूनही हेतुपुरस्सर ठेवी व वाहतूकदारांची बिले दिली जात नाहीत, ही रक्कम द्यावी अन्यथा आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com