महिन्याची पाणीपट्टी भरणार नाही

महिन्याची पाणीपट्टी भरणार नाही
Published on

chd213.jpg
84883
कळसगादे : सरपंच ममता दळवी यांच्याकडे निवेदन देताना सुतार गल्लीतील महिला.
--------------------
महिन्याची पाणीपट्टी भरणार नाही
कळसगादे सुतार गल्लीतील महिलांची भूमिका : सरपंचांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २१ : कळसगादे (ता. चंदगड) येथील सुतार गल्लीमध्ये एक महिना पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे या महिन्याची पाणीपट्टी भरणार नाही, अशी भूमिका या गल्लीतील महिलांनी घेतली आहे. त्यांनी मागणीचे निवेदन सरपंच ममता दळवी यांना दिले आहे.
गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत नवीन नळपाणी योजना मंजूर झाली आहे. ठेकेदाराची मनमानी व प्रशासनाकडून दूर्लक्ष असल्यामुळे गावातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. गावाला टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. या स्थितीत सुतार गल्लीतील महिलांना एक किमीवरील विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे. एका बाजूला ग्रामपंचायतीची पाणीपट्टी भरायची आणि दुसऱ्या बाजूला एवढे शारीरिक श्रम होत असतील, तर त्या महिन्याची पाणीपट्टी माफ करावी, अशी मागणी महिलांनी केली आहे. निवेदनावर शिवानी सुतार, लता सुतार, राजश्री सुतार, साधना सुतार, संजना सुतार, सुवर्णा सुतार, प्रभावती सुतार, मनोहर सुतार, मंगल शिंटे, छाया सुतार, कल्पना सुतार, आदींच्या स्‍वाक्षऱ्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com