महावितरणची कार्यप्रणाली समजून घ्यावी

महावितरणची कार्यप्रणाली समजून घ्यावी

महावितरणची कार्यप्रणाली समजून घ्यावी
सुहास मिसाळ : खेडे येथे ग्राहक शिबिर उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २३ : महावितरणकडून ग्राहकांना सर्व प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यावर कंपनीचा भर आहे. बिल, खंडित वीजपुरवठा व तांत्रिक दोषांबद्दल ग्राहकांच्या तक्रारी असतील तर त्या दूर करण्यास महावितरणचे प्रशासन कटिबध्द आहे. महावितरणची कार्यप्रणाली समजून घेण्याचे आवाहन उपकार्यकारी अभियंता सुहास मिसाळ यांनी केले.
खेडे (ता. आजरा) येथे महावितरण आजरा उपविभागांतर्गत अकरा केव्ही, एमईआरसीचे भादवण फिडरमध्ये बिलिंग कशा प्रकारे होते, याबद्दलचे शिबिर झाले. बिलिंग कशा प्रकारे होते याबद्दल शिबिरात ग्राहकांना माहिती दिली. यावेळी उपकार्यकारी अभियंता मिसाळ प्रमुख उपस्थित होते. सरपंच डॉ. संदीप देशपांडे अध्यक्षस्थानी होते. ग्रामपंचायतीच्या सहकार्याने कार्यक्रम झाला.
यावेळी इंडेक्स बिलिंग काय आहे? विजेचा वापर कमी असणाऱ्या ग्राहकांमध्ये असंतोष असतो. त्यांच्या अडीअडचणींवर महावितरण कंपनीने एमईआरसीच्या परवानगीने ग्राहकांना स्वतःची रीडिंग टाकण्याची नवीन कार्यप्रणाली निर्माण केली आहे. त्या कार्यप्रणालीमध्ये रीडिंगच्या उपलब्धतेसाठी करावयाची कार्यवाही याबाबत माहिती दिली. ग्राहकांनी विचारलेल्या प्रश्नांचे समाधान केले. शाखा अभियंता शरद पाटील, सहायक लेखापाल इम्रान अत्तरवाले व श्रवण कांबळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी घरगुती वीज ग्राहक, कृषी पंपाचे ग्राहक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com