पीएन प्रकृती

पीएन प्रकृती

पी. एन. पाटील यांची प्रकृती जैसे थे
...........
मुख्यमंत्र्यांकडून विचारपूस ः मुंबईला हलवण्याबाबत मुश्रीफांची डॉक्टरांशी चर्चा
.........
कोल्हापूर, ता. २२ ः मेंदूला झालेल्या गंभीर दुखापतीनंतर गेले चार दिवस अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या आमदार पी. एन. पाटील यांच्या प्रकृतीत अजूनही सुधारणा नाही. कृत्रिम श्‍वासोच्छवास व व्हेंटिलेटरवरच त्यांना ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, परदेश दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी फोनवरून ॲस्टर आधारच्या डॉक्टरांशी संपर्क साधून पाटील यांना एअर अॅम्ब्युलन्समधून मुंबईला हलवण्याबाबत आज चर्चा केली. पण, पाटील यांना अन्य ठिकाणी हलवण्यासारखी परिस्थिती नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
आज मुख्यमंत्री, वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी रुग्णालयात भेट देऊन डॉक्टरांशी चर्चा केली. त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘ॲस्टर’चे डॉ. अजय केणी व डॉ. उल्हास दामले यांच्याशी चर्चा करून श्री. पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली तसेच चांगले उपचार करण्याची विनंती केली. श्री. पाटील यांचे पुत्र व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील यांच्याशीही मुख्यमंत्री शिंदे यांनी चर्चा करून धीर दिला.
रविवारी (ता. १९) बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने आमदार पाटील यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली आहे. त्याचदिवशी त्यांच्यावर ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. सोमवारी केलेल्या चाचणीत शस्त्रक्रिया केलेल्या ठिकाणी नव्याने रक्तस्त्राव झाला नसल्याचे आढळून आले. त्यानंतर मात्र त्यांच्या प्रकृतीत किंचीतही सुधारणा न झाल्याने त्यांच्या प्रकृतीविषयी काळजी करण्यासारखी स्थिती असल्याचे हॉस्पिटलने जाहीर केलेल्या मेडिकल बुलेटीनमध्ये म्हटले आहे.
आजही पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालय परिसरात त्यांचे कार्यकर्ते, सर्वपक्षीय नेत्यांनी मोठी गर्दी केली होती. गावागावांत त्यांना स्वास्थ्य मिळून तब्येत चांगली व्हावी, यासाठी देवांना अभिषेक, साकडे घातले गेले.
..........

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com